ना़टक किंवा चित्रपट माध्यमात कारकीर्द घडवण्याची स्वप्न अनेक जण पाहतात, त्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक कलाकार मायानगरी मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी दाखल होतात, त्यातील प्रत्येकाला संघर्ष करुन,स्वत:च कतृव सिध्द करावं लागत, तेव्हा कुठे या क्षेत्रातील लोक उभं करतात आणि जो खरोखर कर्तृव्तवान आणि कलासक्त असतो त्यांना संधी ही मिळतेच आणि यश सुध्दा त्यांच्यापसून लांब रहात नाही; पण जेव्हा एखादा संधी मिळालेला कलाकार यशस्वी होतो, नाटकांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड झळकू लागतात त्याच काम जेव्हा प्रेषकांना भावतं आणि त्यातून मिळणारं यश; त्या यशाच्या शिखरा पोहचल्यावर कलाकाराची बदललेली जीवनशौली, दृष्टीकोन या सर्वाच अगदी ठळकपणे चित्रण“रंगकर्मी” मधून झालेलं दिसून येतं;
ही कथा आहे केशव (अमोल कोल्हे) ची जो गावात लहान मोठ्या नाटकांमधून किंवा विविध लोककलेच्या माध्यमातून स्वत:ची अभिनय कला सिध्द करतोय. आणि नाटकामध्ये नायक म्हणून काम करण्याचं त्याचं स्वप्न आहे, ते सत्यात उतरवण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला आहे. पण मुंबईत ओळखीचं कोणीच नसल्यामुळे रहाण्या-खाण्याची देखील नामुष्की. मग त्यासाठी संघर्ष; पण आजूबाजूला आसे अनेक जण असतात जे बारकाईने आपल्या कामाची दखल घेतात, त्याची साथ मिळाल्यावर कुठेतरी या क्षेत्रात शिरण्याची संधी मिळते.
चित्रपटात रंगभुषाकार (अमोल कोल्हे) कांबळी केशवची कला ओळखत निर्मात्यांशी बोलून अनेक नाटकांमध्ये त्याला भूमिका मिळवून देण्यापासून ते स्वत:च्या घरात रहाण्याची सोय करण्यापर्यंत सर्वतोपरीने मदत करतात. केशवची भूमिका असणार्या नाटकांना ज्यावेळी प्रेषकांकडून दाद मिळू लागते व तो लोकप्रिय नायक म्हणून प्रेषकांसमोर येतो, त्यावेळी सहाजिकच रूपेरी पडद्यावर देखील नायक म्हणून ऑफर्स मिळतात आणि त्यातून मिळणारं ‘स्टारडम’ आणि अश्यातच जर का चुकून सुध्दा मी पाणाची हवा डोक्यात गेली किंवा माजुरडेपणा दाखवला तर काय गत होते? हे उत्तमरित्या मांडण्याचा प्रयत्न लेखकांने केलेला दिसून येतो. तसंच नायकाच्या हाती काळी व पांढरी बाहूली देऊन आणि त्यातून स्वतच्या मनातलं स्वत:शीच बोलत त्याच्या दोन्ही मनांचा वेध घेण्याचा नामी आणि रंजक उपाय कथेत आढळतो. त्यामुळे दिग्दर्शकाने कथेला फुलवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते हा चित्रपट पाहिल्यावर कळतं; चित्रपटचा विषय देखील वेगळा असून अमोल कोल्हे , अमोल कोल्हे , सर्मिष्ठा राऊत, शीतल दाभोळकर, जयंत सावरकर यांच्या सकस व परिपूर्ण अभिनयामुळे चित्रपट संपेपर्यंत प्रेषकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाला संगीत आणि गाणी देखील साजेशी असून त्याची पेरणी आणखीन करायला हरकत नव्हती; विशेष म्हणजे तांत्रिक बाजू आणि कलाकारांची निवड ही “रंगकर्मी” ची जमेची बाजू म्हणता येईल.
सुरुवातीपासून ते चित्रपटाच्या शेवटच्या सीन्स पर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढेल असा हा चित्रपट आहे; पण पटकथेत काहीशी चूक घडल्यामुळे चित्रपटाची कलाकृती बहरता-बहरता राहून जाते; मध्यांतर नंतर जेव्हा केशव एक प्रस्थापित नायक बनल्याचं दाखवलय, याचं साधर्म्य कुठेतरी “फॅशन” या हिंदी चित्रपटातील “कंगना रणावत” च्या भूमिकेशी सुद्धा जवळ जाणार्या वाटतात आणि त्याचा शेवट काय होतो हे देखील सांगायला नको; थोडक्यात कलाकाराला जेव्हा माज चढतो त्यावेळी त्याचा “करियर ग्राफ” देखील कसा घसरतो हे दाखवण्यात आलं आहे; पण प्रयत्न किंचित वेगळ्या तर्हेनं व्हायला हवा होता; तो झाला असता तर त्यामध्ये वास्तवता ठळकपणे दिसली असती आणि यापेक्षा देखील सुंदर मांडणी प्रेक्षकांना अनुभवता आली असती; एकूणच नविन विषय आणि दर्जेदार अभिनय यासाठी कलाकाराच्या रोमहर्षक प्रवासाविषयी आणि भावविश्वाविषयी कथानक असल्याने प्रत्येक नवोदित कलाकाराने एकदातरी “रंगकर्मी” पहायलाच हवा!
— सागर मालाडकर
Leave a Reply