बातमी : इच्छामरणासाठी लवाटे दांपत्याची राष्ट्रपतींना हाक
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ११.०१.२०१८, पृ. ९
विभाग – १
- प्रस्तावना :
- हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें. ( इच्छुकांना तो लेख , माझी वेबसाईट subhashsnaik हिच्यावर पाहतां येईल. )
सरकार इंट्रोड्यूस करणार असलेल्या कायद्याचें कुठवर आलें, याची कांहीं कल्पना नाहीं .
- जैन कम्युनिटीने सुप्रीम कोर्टात इच्छामरणाशी संबंधित विषयावर याचिका दाखल केलेली आहे (त्यावर आपण पुढे बोलूं ).
- या संदर्भात वाचनात आलेली ( वर उल्लेखलेली ) बातमी, एका बाजूला, मनाला अत्यधिक अस्वस्थ करणारी आहे ; तर, दुसर्या बाजूला, मूलभूत विचार करायला लावणारी आहे.
काय आहे ती बातमी ? –
गेली ३–३१ वर्षें लवाटे नांवाचें दांपत्य, आमदार, खासदार आणि भारताचे राष्ट्रपती यांची दारें ‘इच्छामरणा’साठी ठोठावत आहेत. श्री. नारायण लवाटे आतां आहेत ८७ वर्षांचे तर श्रीमती इरावती लवाटे आहेत ७८ वर्षांच्या. अजून त्यांच्या मागणीला कांहींच प्रतिसाद आलेला नाहीं. म्हणून आतां त्यांनी अशी ‘चेतावनी’ दिली आहे की ३१ मार्च २०१८ पर्यंत कांहीं प्रतिसाद मिळाला नाहीं, तर ते दोघे विषप्राशन करून स्वत:चें जीवन संपवतील.
Oh ! No !! , Oh ! No !!
- म्हणून, इच्छामरण या विषयावर बोलणें-लिहिणें-विचार_करणें अत्यावश्यक झाललें आहे, कारण हा विषय माझ्यासाठी ‘क्लोज् टु दि हार्ट्’ आहे ; आणि तसा तो सर्व सुजाण नागरिकांसाठीही असायला हवा, असें मला वाटतें.
- इच्छामरण आणि दयामरण :
- हल्लीच्या चर्चा मुख्यत्वें ‘Euthanasia’ या विषयाभोवती फिरताहेत. ‘Euthanasia’ चा अर्थ आहे, ‘दयामरण’. त्याचा उल्लेख पुढे केलेलाच आहे.
- महाभारतात ‘इच्छामरण’ हा शब्द येतो. भीष्मांना इच्छामरणाचा वर मिळाला होता. कुरुक्षेत्रावरील युद्धात ते विद्ध होऊन शरपंजरी पडले, त्यावेळी दक्षिणायन चालू होतें आणि भीष्मांना तर उत्तरायण लागल्यावरच प्राण सोडायचे होते. आणि, ते इच्छामरणी असल्यामुळे, त्यानी ते साध्य करूनही दाखवलें. He died with dignity.
- मात्र, आज जो ‘इच्छामरण’ हा शब्द प्रचारात आलेला आहे, त्याचा संदर्भ व अर्थ वेगळा आहे. हा शब्द आपल्याकडे आला आहे इंग्रजी शब्द Euthanasia या शब्दावरून, आणि तो शब्द मूळचा ग्रीक आहे. त्याचा अर्थ आहे ‘Mercy-Killing’ किंवा ‘Painless Death’. (संदर्भ – वेबस्टर डिक्शनरी). म्हणून आपल्याकडे ‘दयामरण’ हा शब्द आधी निर्माण झाला ; आणि आतां त्याऐवजी ‘इच्छामरण’ हा शब्द वापरला जात आहे. (असे प्रतिशब्द इतरत्रही बदलले गेले आहेत. उदा. इंग्रजी ‘Will’ या शब्दासाठी आधी ‘मृत्युपत्र’ हा शब्द वापरला जाऊं लागला, आणि आतां ‘इच्छापत्र’ हा शब्द वापरला जातो ).
- परंतु, ‘दयामरण’ व ‘इच्छामरण’ हे दोन्ही भिन्न आहेत. ‘दयामरण’ हा Euthanasia या शब्दाला योग्य प्रतिशब्द आहे. एखादा पेशंट इतका व्याधिग्रस्त असतो की त्याचा मृत्यू अटळ असतो, आज नाहीं तर उद्या तो होणारच असतो. कधी तो कोमामध्ये गेलेला असतो, व त्यातून बाहेरच येत नसतो. कधी तो कृक्षिम श्वासोच्छ्.वासावर, व्हेंटिलेटरवर असतो, कधी कॅन्सरसारख्या असाध्य रोगानें तो इतका पीडित असतो की त्याचे त्राण पूर्णपणें संपलेलें असते , कधी तो ‘brain-dead’ झालेला असतो. अशा वेळी जर रोग्याच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले, तर डॉक्टर त्या ‘Terminal Stage’ च्या पेशंटला मरण देऊं शकतात ( उदा. – व्हेंटिलेटर चा सपोर्ट काढून टाकून). हें खरोखरच दयामरण झालें. याच्या विषयीचें नियम ठरवून, सरकार कायदा करणार आहे.
- [ व्हेंटिलेटर : एक आठवण : माझी पत्नी डॉ. स्नेहलता —- जी पूर्णपणें Rationalist होती,
हिनें लंग्-कॅन्सरनें ( Lung-Cancer) ग्रस्त असतांना मला सांगून ठेवलें होतें की, कांहीं झालें तरी व्हेंटिलेटर लावून तिचें आयुष्य वाढवायचें नाहीं. पण त्यावर कांहीं निर्णय घेण्याची वेळ आलीच नाहीं, कारण जरी तिला श्वासोच्छ्वासाला त्रास होत होता, व ती ऑक्सिजनवर होती, तरी मृत्यूच्या आधी कांहीं मिनिटांपर्यंत ती पूर्णपणें शुद्धीत होती, पूर्णपणें समजून, संगतवार संवाद करत होती. व्हेंटिलेटरचा विचार करायची वेळच आली नाहीं. पण तशी वेळ आलीच असती, तर तिचा, व्हेंटिलेटर–न–लावण्यांबद्दलचा निग्रह बदलला नसता, याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे ] .
- दयामरण हें इच्छामरण कधी असूं शकते ? जर एखादी व्यक्ती धडधाकट असेल, किंवा जर ती आजारी असेल पण terminal-stage मध्ये नसेल, आणि ती असें इच्छापत्र करेल की मला जर termainal-stage आली, तर मला अशा अशा प्रकारें मरण द्यावें. म्हणजे, डॉक्टर लोक, terminal- stage च्या पेशंटच्या नातेवाईकांच्या संमतीनें जें करतात, त्याची वाट व पाहतां संबंधित व्यक्तीनें स्वत:च तसें आधीच लिहून ठेवलेलें असतें. मात्र, अशा, आधीच लिहून ठेवलेल्या इच्छेस कायदेशीरपणा प्राप्त होत नाहीं, अजून तरी. ( याच्याशी संबंधित चर्चा पुढे करूं ) .
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M- 9869002126.
eMail : vistainfin@yahoo.co.in
Summary :
Ichchha-maran is not ‘Euthanasia’ ; it is ‘A Dignified Death, through one’s own free-will & decision’ .
‘Law’ is really about the relationship of an individual & the Society. It is not really about acts that do not affect the society.
We honour persons like soldiers, policemen etc, who willingly embrace Death.
We also respect Great personalities like Veer Sawarke & Acharya Vinoba Bhave, who embraced Death willingly through ‘Prayopveshana’. Similarly, we must honour ‘ordinary’ human beings who want to embrace Death willingly ; because they really are extra-ordinary !
For last 30 years, the old Lawate couple has been petitioning for the Right-to- ‘IchchhaMaran’, but in vain ! ! So, people like you-&-me should support their cause & make this a Movement , so as to build pressure & ‘persuade’ the Government and the Law-makers to enact a suitable Law soon.
–