साधारण तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी स्वतःची बोलेरो जीप भाड्याने घेऊन जायचो म्हणजे व्यवसाय म्हणून नव्हे तर आवड म्हणून ,एक दिवस सकाळीच सात वाजता स्नेह्यांचा फोन आला – आमच्याकडे मुंबईहून पाहुणे आले आहेत तर नऊ वाजता मालंप्याला ( देवगडातील मालपे गाव ) जायचे आहे तेव्हा तू नऊ वाजता आमच्या घरी हजर हो .
खरंतर मालंप्याला मला जायला नको वाटायचे , एकतर जंगल भाग , रस्ते काय विचारूच नका , त्यांना नाही म्हणणे मला शक्य नव्हते .मुंबईच्या लोकांना घेऊन मी मालंप्याला पोहोचलो तेव्हा साधारण दुपारचे बारा वाजले होते. ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्यापैकी मला कुणीच ओळखत नव्हते . , ज्यांना घेऊन गेलो होतो त्यांच्याशीही माझा फारसा परिचय न्हवता .त्यामुळे असे भाडे घेऊन गेलो कि मी नेहमी गाडीतच बसून राहायचो .मुंबईची मंडळी आत घरात गेली ती गेलीच , घर मोठं होत टिपिकल कोकणातील पडवी खळं वगैरे , तासाभराने एक १० /१२ वर्षाचा मुलगा” जेवायला चला” ,सांगायला आला . मी त्याच्या मागोमाग गेलो . बाहेरच्या पडवीत जेवणाचे ताट ठेवले होते , मला खुणावून तो आत गेला , मी जेवायला सुरवात केली आणि ज्यांना मी घेऊन आलो होतो ते घाईघाईने बाहेर आले म्हणाले
” तुम्ही जेवायला सुरवात केलीत अहो त्यांना माहित नाही तुम्ही पण ब्राम्हण आहेत ते ,बोलण्याच्या नादात माझ्याही लक्षात आले नाही , त्यांना वाटलं तुम्ही ड्रायव्हर म्हणजे …..
मी – ” राहुद्याहो , काही वाटून घेऊ नका ”
” असं कस आम्हाला हि लाजिरवाणी गोष्ट आहे , एका ब्राह्मणाला पडवीत जेवायला वाढलं ! ”
पुढे बरंच काही ते सांगत होते त्यांना या गोष्टीच खूपच वाईट वाटलं होत.
शेवटी मी म्हटलं
” नका तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ , खरंच मला जरासुध्दा वाईट वाटलेले नाही , कारण मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो म्हणून मी स्वतःला ब्राह्मण समजत नाही , तर ब्राह्मण समाजाने , माझ्या आईवडिलांनी , माझ्या कुटुंबाने माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत , विशेषतः माझे वर्तन – माझी ओळख माझ्या वर्तनाने झाली पाहिजे , माझ्या जन्माने नाही , मला पडवीत जेवायला वाढलेत म्हणून माझे वर्तन बदलणार नाही कि जेवायच्या आधी अवथ्याही घालायच्या विसरलो नाही . आणि माझा अपमान , कमी पणा झाला असं जराही वाटलं नाही कारण आपल्यावरील संस्कार आणि आपले वर्तन आपली जात ठरवत असते
हे तर नकळत चुकून तुमच्या कडून घडलं आहे , आणि जाणूनबूजूनही तुम्ही केलं असतं तरीही मला काही वाटलं नसत कारण माझा स्वतःच्या वर्तनावर विश्वास आहे , आणि तेच तुम्हाला , मला घरात बोलवायला लावील .
” हा तुमचा मोठेपणा आणि नम्रपणा झाला ”
” हीच तर माझी ओळख आहे , हीच माझी जात आहे! ”
malakans
Leave a Reply