नवीन लेखन...

ओळख

साधारण तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी स्वतःची बोलेरो जीप भाड्याने घेऊन जायचो म्हणजे व्यवसाय म्हणून नव्हे तर आवड म्हणून ,एक दिवस सकाळीच सात वाजता स्नेह्यांचा फोन आला – आमच्याकडे मुंबईहून पाहुणे आले आहेत तर नऊ वाजता मालंप्याला ( देवगडातील मालपे गाव ) जायचे आहे तेव्हा तू नऊ वाजता आमच्या घरी हजर हो .

खरंतर मालंप्याला मला जायला नको वाटायचे , एकतर जंगल भाग , रस्ते काय विचारूच नका , त्यांना नाही म्हणणे मला शक्य नव्हते .मुंबईच्या लोकांना घेऊन मी मालंप्याला पोहोचलो तेव्हा साधारण दुपारचे बारा वाजले होते. ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्यापैकी मला कुणीच ओळखत नव्हते . , ज्यांना घेऊन गेलो होतो त्यांच्याशीही माझा फारसा परिचय न्हवता .त्यामुळे असे भाडे घेऊन गेलो कि मी नेहमी गाडीतच बसून राहायचो .मुंबईची मंडळी आत घरात गेली ती गेलीच , घर मोठं होत टिपिकल कोकणातील पडवी खळं वगैरे , तासाभराने एक १० /१२ वर्षाचा मुलगा” जेवायला चला” ,सांगायला आला . मी त्याच्या मागोमाग गेलो . बाहेरच्या पडवीत जेवणाचे ताट ठेवले होते , मला खुणावून तो आत गेला , मी जेवायला सुरवात केली आणि ज्यांना मी घेऊन आलो होतो ते घाईघाईने बाहेर आले म्हणाले

” तुम्ही जेवायला सुरवात केलीत अहो त्यांना माहित नाही तुम्ही पण ब्राम्हण आहेत ते ,बोलण्याच्या नादात माझ्याही लक्षात आले नाही , त्यांना वाटलं तुम्ही ड्रायव्हर म्हणजे …..

मी – ” राहुद्याहो , काही वाटून घेऊ नका ”

” असं कस आम्हाला हि लाजिरवाणी गोष्ट आहे , एका ब्राह्मणाला पडवीत जेवायला वाढलं ! ”

पुढे बरंच काही ते सांगत होते त्यांना या गोष्टीच खूपच वाईट वाटलं होत.

शेवटी मी म्हटलं

” नका तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ , खरंच मला जरासुध्दा वाईट वाटलेले नाही , कारण मी ब्राह्मण  कुळात जन्माला आलो म्हणून मी स्वतःला ब्राह्मण समजत नाही , तर ब्राह्मण समाजाने , माझ्या आईवडिलांनी , माझ्या कुटुंबाने माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत , विशेषतः माझे वर्तन – माझी ओळख माझ्या वर्तनाने झाली पाहिजे , माझ्या जन्माने नाही , मला पडवीत जेवायला वाढलेत म्हणून माझे वर्तन बदलणार नाही कि जेवायच्या आधी अवथ्याही घालायच्या विसरलो नाही . आणि माझा अपमान , कमी पणा झाला असं जराही वाटलं नाही कारण आपल्यावरील संस्कार आणि आपले वर्तन आपली जात ठरवत असते

हे तर नकळत चुकून तुमच्या कडून घडलं आहे , आणि जाणूनबूजूनही तुम्ही केलं असतं तरीही मला काही वाटलं नसत कारण माझा स्वतःच्या वर्तनावर विश्वास आहे , आणि तेच तुम्हाला , मला घरात बोलवायला लावील .

” हा तुमचा मोठेपणा आणि नम्रपणा झाला ”

” हीच तर माझी ओळख आहे , हीच माझी जात आहे! ”

malakans

Avatar
About malakans 5 Articles
साधारण 20/ 25 वर्षा पूर्वी मासिकातून , नियतकालिकातून , साहित्य लेखन सध्या facebook ,twitter , whatsapp वरुन वैचारिक लेखमाला वैचारिक चर्चा - अत्यंत आवडता विषय तसेच संगीत साधना , नवीन गाण्यांची निर्मिती food प्रोसेसिंग चे अनेक courses केले .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..