आधुनिक शिवणयंत्राचे जनक आयझॅक मेरिट सिंगर यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८११ रोजी झाला.
ते अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये राहत होते.आयझॅक मेरिट सिंगर यांचे सुरुवातीचे आयुष्य कठीण होते.त्यांच्या आईचे निधन झाला.वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या वागण्याला कंटाळून सिगर यांनी वयाच्या १२ व्या वर्षी घर सोडले. मेकॅनिक म्हणून काम केले. आयझॅक मेरिट सिंगर यांना अभिनयाची आवड होती. छंदासाठी थिएटर जॉईन केले. तो थिएटर ग्रुप बंद झाल्यावर सिंगरने पूर्णवेळ मेकॅनिक होण्याचा निर्णय घेतला. सिंगर मशिन बनवल्यावर त्याने एडवर्ड क्लार्कसोबत औपचारिकरीत्या लॉन्च केले आणि ते जगभर प्रसिद्ध झाले.मेकॅनिक म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांचा सर्वात लोकप्रिय प्रयत्न आधुनिक शिवण मशीन बनले, ज्याला जग सिंगर मशीन या नावाने ओळखते.इतरांनी शिवलेले कपडे त्यांना आवडत नसल्याने स्वत:साठी शिवणयंत्र बनवून स्वत: कपडे शिवण्यास सुरुवात केली.
१८३९ मध्ये सिंगर यांनी पहिल्यांदा खडकात छिद्र पाडण्यासाठी मशीन बनवली.नंतर लाकूड आणि धातू कापण्यासाठी मशीन बनवली.दरम्यान १८५१ मध्ये त्यांना शिलाई मशीन बनवायची संधी मिळाली. त्यांनी ते मशीन फक्त दुरुस्तच केले नाही, तर आणखी चांगले मशीन बनवण्याचा संकल्प केला आणि केवळ ११ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ते बनवले आणि जगासमोर सादर केले.हे यंत्र सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले.जगाला पहिले आधुनिक शिलाई मशीन दिल्यानंतर त्यांनी एक कंपनी स्थापन केली,जी अमेरिकेची पहिली बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा पहिला कारखाना न्यूयॉर्कमध्ये स्थापन झाला. हाताने चालणारी ही शिलाई मशीन त्यावेळी १० डॉलरमध्ये उपलब्ध होती. काही वर्षांतच हे यंत्र जगभर लोकप्रिय झाले. पुढे सिंगरने पेटंटही घेतले.
जे शिलाई मशीन आधुनिक आहे आणि हाताने चालते असे सांगितले जात होते,पुढे ते पायी चालायला लागले आणि मग ते विजेवर चालायला लागले आणि अनेक सुविधांसह आता आपल्यासमोर आहे. सिंगर शिलाई मशीनने प्रत्येक घरात आपले स्थान निर्माण केले.आज जगात अनेक ब्रँड्सची शिलाई मशीन उपलब्ध असली तरी तिला आधुनिक टच देण्याचे श्रेय फक्त सिंगरलाच जाते.
आयझॅक मेरिट सिंगर यांचे २३ जुलै १८७५ रोजी निधन झाले.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply