नवीन लेखन...

नाजायज पुल आणि लावारीस मुंबैकर

हरामी म्हणजे नाजायज, अनौरस. आणि पुल म्हणजे कालच अंधेरीला रेल्वे लायनीला भेटायला आलेला. हा ब्रिज अनौरस असल्याची बातमी आजच पेपरमधे वाचली.

पण मला वाटतं, की या मुंबईतली गेल्या चार-पाच दशकात अस्तित्वात आलेली बहुतेक प्रत्येक गोष्ट अनौरस आहे. एकेकाळच्या ‘मुंबाई’ला, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ‘मुंबाबाय’ नांवाची वेश्या बनवून तिला शांघायची लाली, कॅलिफोर्नियाची पावडर आणि सिंगापूरची सिंगापुरची टिकली लावून वेश्येच्या रुपात जगाच्या बाजारात उभी करून आणि तिच्याशी शय्यासेबत करायला देश आणि विदेशातून वखवखलेले बोलवायचे, हे गेली अनेक वर्ष सुरू आहे. ‘आई ने पोराला जन्म द्यायचा आणि त्याच पोराने आईला बाई बनवून खिडकीत बसवायचं’ असं काहीतरी हे आहे. आईची दलाली करुन मिळालेल्या मलिद्याचा वाटा सर्वच यंत्रणानी गोडी-गुलाबीने वाटून घ्यायचा आणि त्या शय्यासोबतीतून एखादं पोर जन्मलं, की मग एक दुसऱ्याकडे बोट दाखवणं सुरू होतं. अर्थात हे काय नविन नाही. वेश्याबाजारात हे असंच होतं असतं. अंधेरीच्या पुलाबाबतही हेच घडताना दिसतं. .!

आपापल्या वकुबाने सर्वचजण या मुबाईचची मुंबाबांई बनवलेल्या वेश्येच्या दलालीच्या शर्यतीत सामिल झालेले दिसताहेत. समुद्राची जागा बळकावून बांधलेल्या नरिमन पाईंटाच्या पांढऱ्याधोप सा मजली हापिसापासून ते टोल नाक्यावरच्या टिनपाट डबड्यात बसणाऱ्या सर्वांचा यात सहभाग आहे. तिन दिशाना पाहणारे सिंव्ह टेह्ळणीसाठी ठेवून कफनासारख्या रंगाच्या पांढऱ्या सा मजली इमारतीत त्याच कफनाच्या रंगाचे पांढरे धोप कपडे घालून बसण्यासाठी जे झगडे चाललेले आपल्याला पेप्रात वाचायला मिळतात ना, ते वास्तविक दलालीच्या रकमांच्या वाट्यासाठी आहेत. त्या विरुद्ध कुणी क्षीण आवाजात जरी काही बोललं, तर त्याच सिंव्हाना शिक्क्याच्या रुपात त्यांच्या अंगावर सोडलं जातं आणि मग पुन्हा त्याच सिंव्हांच्या जांभळ्या सही-शिक्याच्या सिलबंदतेखाली दलालीचा धंदा जोमाने सुरू होतो..

निर्जीव पूल जाऊदे, तो असेलही अनौरस. पण आपण सामान्य मुॅबैकर? आपण तरी कुठे औरस आहोत. राजकारणी तोंडाने म्हणत नसले तरी, आपल्याला अनौरस असल्याचा अनुभव वारंवार येतोच की. अगदी स्वत:ला आपले पालक म्हणवणाऱ्या सरकारी कार्यालयापासून ते रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडून आपल्याला जो तिरस्कार सहन करावा लागतो किंवा ‘जो करना है वो कर लो’ या टाईपची उत्तरं अनुभवावी लागतात किंवा पुलांवर किड्या-मुंग्यापेक्षाही बदतर मौतीने मरावं लागतं, ते आपण अनौरस असल्याने. औरस पोरांची काळजी निगुतीने घेतली जाते, अनौरसाला जगण्याचा हक्कच नाकारला जातो. आपला सरळ सोपं आयुष्य जगण्याचा हक्चक नाकारला जातोय.

मुंबईनामक जगप्रसिद्ध वारांगनेसेबत एकाच मंचकावर शय्या करण्यासाठी शोधलेल्या देशी-विदेशी गिऱ्हाईकांच्या अनैतिक आणि अनैसर्गिक संगातून मग कालच्या अंधरीच्या पुलासारखी अनौरस संततीच निर्माण होणार हे काय सांगायला हवं..? पण स्वार्थाने अंध झालेले भ्रष्ट राजकारणी आणि ‘सत्यमेंव जयत्ते’च्या पाटीखाली ढळढळीत असत्याचा नागडा बाजार मांडणारे प्रशासकीय अधिकारी उद्या ‘भारत माते’लाही ‘भारती बाय’ बनवून बाजारात बसलयवायला कमी करणार नाहीत, काय सांगावं. भ्रष्टाना कुठे राष्ट्र असते..! राष्ट्र वैगेरे चोचले सामान्य बेवारशांचे..

चला जांऊ दे. मुंबय बायचं ते कोडगेपणाचं स्पिरिट दाखवून आपण तोंडावर आलेल्या निवडणूकीच्या महानाट्याच्या तयारीला लागू…आपल्याला मुंबाबायला आणि भारतीबायला जगात ‘दाखवायचं’ कर्तव्य कुणी करायचं, त्यांना निवडून द्यायचं ‘पवित्र’ कर्म करायचंय. त्या एका दिवसाकरता आपल्याला औरसत्व देण्यात येणार आहे. या एक दिवसाच्या औरसत्वासाठी उरलेली चार वर्ष आणि ३६४ दिवस बेवारश्यासारखी काढणं आपलं कर्तव्य आहे, कारण ‘त्याग’ ही आपली संस्कृती आहे. म्हणतात ना, त्यागाचा एक क्षण भोगाच्या लाख क्षणांपेक्षा मोठा असतो, म्हणून..!!

पुल काय पडतंच असतात, पुलावर माणसं काय मरतच असतात. त्यातच अडकून पडलो तर मग महासत्ता कधी होणार आपण..!!

— नितीन साळुंखे
9321811091

(काही म्हणतील की, सर्वच राजकारणी किंवा सर्वच अधिकारी भ्रष्ट नाहीत. मान्य. पण आपण लोकशाही व्यवस्थेत राहातो आणि लोकशाहीत ‘बहुसंख्यां’च्या आधारावर चालते. हाच नियम राजकारणी आणि अधिकारी यांना लावावा, ही विनंती.)

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..