ਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते . दूध हे अमृत आहे . अर्थातच देशी गायीचे दूध असेल तरच ते अमृत आहे . जर्सी , हॉस्टीन अशा प्रजातींचे दूध हे विष स्वरूप आहे . ` Devil in the milk ‘ या पुस्तकात शास्त्रज्ञांनी तसे प्रयोगांनी सिद्ध केले आहे .
देशी गायीच्या दुधामध्ये C.L.A. हा घटक असतो . या Conjugated Lioninc Acid Cerebrocide यामुळे मेंदूच्या पेशींची ( D.N.A ) ची झीज होण्याचे प्रमाण कमी होते . त्यामुळे स्मृती , बुद्धी , मेधा , जरा , नेत्र व इंद्रिय शक्ती या दीर्घकाळपर्यंत शाबूत राहतात . शिवाय C.L.A. मुळे शरीरातील Cholesterol चे प्रमाण नियंत्रित राहते . हे गायीच्या दूधाचे वैशिष्ट्य केवळ देशी म्हणजेच भारतीय वंशाच्या गायींमधेच आढळून येते .
देशी गायींच्या पाठीवर ( hump ) उंचवटा असतो व त्यामध्ये ‘ सूर्यकेतू ‘ नाडी असते . त्यामुळे रानात चरताना सूर्याची उष्णता त्यामध्ये शोषून घेतली जाते व गायीचे आंत्र देखील लांबीने मोठे असते . त्यामधील बत्तीस प्रकारच्या enzymes द्वारे , पचन होऊन अमृततुल्य दूध , गोमूत्र व गोमय याची निर्मिती होते . दुधापासून विरजण लावून दही , दह्याचे ताक व ताकाचे लोणी , या लोण्यापासून कढविलेले तूप हे श्रेष्ठ दर्जाचे असून रसायन , बल्य , डोळ्यांना हितकारक , स्वर , वर्ण , प्रभा वाढविणारे असते . गायीपासून मिळणाऱ्या या पाचही घटकांना मिळून ‘ पंचगव्य ‘ असे नाव आहे .
आधुनिक शास्त्रानुसार परीक्षण केल्यावर या पंचगव्यात डोळ्यांसाठी उपयुक्त असा carotine घटक , Vit . D , Vit . B12 आढळून आले . तसेच गायीचे तूप , गोमूत्र , दूध हे immuno modulator आहे असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले . यासाठीची विविध पेटंट पण घेण्यात आली आहेत . Immunization , Immunity हे शब्द ‘ करोना’च्या काळात खूपच प्रचलित झाले आहेत . किंबहुना घासून गुळगुळीत झाले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . पण Immunity वाढते म्हणजे ? आज प्रतिकारशक्ती वाढण्याची गोळी , औषध , health suppliment घेतली व उद्या लगेच Immunity वाढली असे होत नाही . ‘ पी हळद हो गोरी ‘ असे घडणारी Immunity ची गोष्ट नाही . व्याधिक्षमत्व हे जन्मापासून वार्धक्यावस्थेपर्यंत आहार , विहार , दिनचर्या , ऋतुचर्या या life style वर अवलंबून आहे .
प्रतिकारशक्ती व व्यधिक्षमत्व या विषयी आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा अग्नी / जाठराग्नीशी संबंधित आहे . जाठराग्नी ( म्हणजे शरीरात असणारी पचनशक्ती ) , पंचमहाभूताग्नी , धात्वाग्नी अशी पचनाचे संदर्भाने विशाल संकल्पना आयुर्वेदात वर्णन केली आहे . आहाराचे पचन हे अग्नीच्या बलावर अवलंबून असते . जसे चुलीतला अग्नी पेटता राहणेसाठी लाकूड हे इंधन ( म्हणजे आहार ) वापरले जाते , तसे जाठराग्नीसाठी आहार हे इंधन होय आणि या आहारात अग्नी तत्त्व असणे फार आवश्यक आहे . तरच आहाराचे पचन उत्तम होते . या पचनानंतर आहाररस , रक्त , मांस असे शरीर धारण करणारे शरीर घटक निर्माण होतात . शरीर व मन प्रसन्न बनते व व्यक्ती स्वस्थ होतो . पर्यायाने त्याचे व्याधिक्षमत्व उत्तम राहते . म्हणून आहार हा षड्रस ( मधुर , आम्ल , लवण , कटू , तिक्त , कषाय ) युक्त व मधुर रस प्रधान असावा . असा पूर्णान्न आहार म्हणजे ‘ देशी गायीचे दूध ‘ व पंचगव्य होय . त्याचे वर्णन करताना चराकादि आचार्य ‘ अत्र गव्यं जीवनीयं रसायनम् ‘ । असे म्हणतात . म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा देणारे व रसायन म्हणजे शरीरातील सर्व अवयव घटक पेशींचे बल , ताकद कायम राखणारे .
क्षीर घृताभ्यासा रसायनानाम् । ( च.सू. २५/४० ) दूध व तुपाचे नियमित सेवन हेच रसायन आहे उपवासाध्वभाष्यस्त्रीव्यायातपकमीभः ।
कलान्तानायनुपानार्थं पयः पथ्यं यथामृतम् ।।
आज सर्वांचीच life style ही धावपळीची आहे . यामध्ये वाहनांनी प्रवास , उभे राहून स्वयंपाक , कामे , प्रवास करणे , फोनवर खूप बोलणे , stress , विचार करणे या सर्वानी क्लांत झालेल्यांसाठी दूध अमृताप्रमाणे काम करते . मधुर चवीचे , शीत , स्निग्ध दूध हे ओजाच्या गुणांप्रमाणेच आहे . त्यामुळे ते रसायन काम करते . वरील सर्व प्रकारे शरीराची झीज होत असताना , शरीराला धारण करणारे म्हणजे शरीराचे बल , ताकद टिकवून ठेवणारे , नवीन पेशींची उत्पत्ती होताना त्यांना ताकद देणारे असे देशी गायीचे दूध आहे हे त्याच्या गुणांवरूनच लक्षात येते . म्हणूनच गायीच्या दुधाला मातृस्तन्याच्या अभावी उपयोगात आणण्याची परंपरा आहे . आता आधुनिक कसोट्यांवर देखील मातृस्तन्य व देशी गायीच्या दुधाच्या घटकांची तुलना करून त्यातील साधर्म्य दाखविले जाते आहे . मातृस्तन्याच्या अभावी गायीचे दूध बालकाला पूरक ठरते . ते सर्वांनाच आजन्म सात्म्य आहे .
प्रतिकारशक्ती ही गर्भावस्थेतच , मातेच्या उदरात असताना बालकाला मिळते . वृद्धावस्थेपर्यंत ते व्याधिक्षमत्व टिकविण्याची जबाबदारी वैयक्तिक असते . यासाठी दैनंदिन आहार , व्यायाम , निद्रा , ब्रह्मचर्य या घटकांचे शास्त्रीय दृष्टीने पालन करणे गरजेचे आहे . रोज शरीराची झीज होत असते , रोज नवीन पेशी शरीरात निर्माण होतात असे wear & tear चे चक्र शरीरात सुरू असते . अव्याहतपणे ! मग अशा शरीराचे नियमन करायचे तर रोज immunity ची गोळी खायची का ? की नवीन आजार आला की त्या प्रत्येकाची लस टोचून घ्यायची ? ही सुज्ञास विचार करावयला लागणारी बाब आहे . आयुर्वेदाने म्हणूनच आहाराचा विचार व पचनशक्तीचा विचार विस्तृतपणे सांगितला . व यामध्ये नित्य दूध व घृत / तूपाचे सेवन करण्याचा आदेशच दिला आहे .
सर्व स्नेहांत्तमं सर्पि … वयसः स्थापनं परम् ।
( अ.ह.सू. ५ ) मंथन प्रक्रियेने तयार केलेले तूप ( लोणकढे तूप ) हेच श्रेष्ठ आहे . जसे जसे तूप जुने होत जाते तसे ते अधिक श्रेष्ठ होते . श्रेष्ठ म्हणजेच शरीरातील सूक्ष्म इंद्रिये , ज्ञानेंद्रिये येथपर्यंत पोहोचण्याची , त्यांचे व्याधिक्षमत्व वाढविण्याची घृतात शक्ती निर्माण होते . Blood Brain Barrier ( BBB ) ही पार करून मेंदूपर्यंत ताकद देण्याचे काम गायीच्या घृतामुळे होते आहे . या घृताचे रसायन , वयस्थापन असे काम होताना , मेंदूतील DNA Damage ची प्रक्रिया हळूहळू कमी होते . Nervous System ची झीज भरून निघते . त्यामुळे वार्धक्यावस्थेत होणारे स्क्रिझोफेनिया , Parkinsons असे वाताच्या प्राबल्याने होणाऱ्या अनेक आजारांवर उपाय करता येतो . त्यांना प्रतिबंध करता येतो . मेंदूच्या nervous system द्वारे ज्या वातवह नाड्यांमार्फत ‘ प्राणा’चे पूरण चलन होते त्याचा मुख्य स्रोत घृतामध्ये आहे .
प्राणमिती प्राणहेतुत्वात् यथा – आयुर्घृतम् ‘
चक्रपाणि
Immunity च्या बाबत , संशोधनात असे सिद्ध झाले आहे की , Immunity वाढविणारी जी द्रव्ये आहेत त्यामध्ये anti oxident घटक असतात व Vit . C , E , B Complex , Bio flavonoids व असे काही घटक या anti – oxident defence मधे महत्त्वाचा भाग घेतात . मुख्यत : free – radical चा नाश होणे थांबवितात व त्यामुळे immuno – modulator effect मिळतो . यामुळे पेशींच्या DNA मधील chromozome ची रचना , कार्ये यामध्ये व्याधींमुळे झालेले दुष्ट / वाईट परिणाम दूर होऊन पेशी त्यांचे योग्य कार्य संपूर्ण ताकदीने करू लागतात . असे समजण्याच्या भाषेत सांगता येते .
घृताबरोबर दही , लोणी , ताक यांचा आहारात उपयोग हा पचनशक्ती व व्याधिक्षमत्व वाढविण्यास आवश्यक आहे . फक्त मंथन प्रक्रिया , विरजण पद्धत यांचा अवलंब यासाठी केला तरच प्रतिकारशक्ती वाढण्याचे परिणाम दिसतात . शास्त्रामध्ये दही , लोणी , ताक सेवनाचे नियम सांगितले आहेत . आहाराचे पचन आतड्यात होते व तेथे पचनास मदत करणारे सूक्ष्म जीव असतात . हा bacterial flora maintain करण्याचे काम ताकाने होते , दह्याने व लोण्याने होते . म्हणूनच ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे . शरीराचे बल हे व्याधिक्षमत्वासाठी महत्त्वाचे आहे . देशी गायीच्या ताज्या लोण्यांमध्ये बल , देण्याची क्षमता आहे . तुष्टी पुष्टी लोण्याच्या सेवनाने मिळते . तसेच बुद्धि – वर्धन करणारे देखील लोणी आहे . बाळकृष्णाची लोणी खातानाची छबी सर्वांनाच परिचयाची आहे .
Stressful , धावपळीच्या जीवनशैलीमुळे Oxidative stress शरीरात निर्माण होतात व त्यामुळे ( toxins ) मंद विषाक्तता तयार होते . देशी गायीच्या पंचगव्य , घृत , सेवनाने ही विषाक्तता नष्ट होते .
याशिवाय आहाराचा मुख्य घटक हा धान्य , भाजीपाला , फळे ह्यांची मात्रा हा आहे . तेव्हा हे धान्य नैसर्गिक / कृत्रिम कशा प्रकारचे सेवन करतो यावर व्याधिक्षमत्व अवलबूंन आहे . हे धान्य , भाजी शेतकऱ्यांनी गायीचे शेणखत व देशी गोमूत्राचा वापर करून पिकविला तर त्या धान्यांमध्ये उर्वरा म्हणजे ( नवीन पेशी ) उत्पन्न करण्याची क्षमता निर्माण होते . उत्तम बीजाची निर्मिती होते व पुढील पिढी सशक्त होते . गोमय गोमूत्राचा खत म्हणून वापर केला तर धान्य , भाज्या यामधे toxins नष्ट करण्याची क्षमता विकसित होते .
भारतीय कृषी क्षेत्रात , शेतकरी त्याच्या घरीच शेणाच्या राशीत मागील वर्षी पुरून ठेवलेले बियाणे पुढील वर्षी पेरणीसाठी वापरत असत . शेणाच्या राशीत पुरल्यामुळे शेणामध्ये असणाऱ्या उष्म्याने त्या बीजामध्ये जमिनीतून मिळणारे पोषकत्व धान्यात परिवर्तित करण्याचे सामर्थ्य येते . बीजफलनाचे , पोषणमूल्य चांगले येते . पर्यायाने सजीवांचे पोषण होऊन प्रतिकारशक्ती वाढते . आज याचा विचार IVF , IUI , PCOD अशा विकारांवर Treatment देताना करावा लागतो . असे नैसर्गिक अन्न सेवन केल्यामुळे अन्न पचविण्याची ताकद वाढते , माणसाची प्रतिकारशक्ती वाढते व रोज नियमित षड्रस आहार दूध , तूप सेवन केल्यामुळे दीर्घायुष्य निरोगी लाभते .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच देशी गायीचे दूध , तूप , लोणी यांचा वापर करावा , गोमूत्रावर आधारित शेती , धान्य यांची निर्मिती करावी . ग्रामीण व शहरी भागात दुवा निर्माण करावा . व देशातील सर्वांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करावी . सर्वांनी सुखी असावे . गायींनी सुखी असावे .
अस्तु स्वस्ति गोभ्यः |
वैद्य . अदिती राहुल कुलकर्णी ओंकार क्लिनिक , कल्याण
९८२१६०८३३५
Leave a Reply