नवीन लेखन...

शोध – यशाचा

“यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.”
– बेन स्वीटलँड, लेखक

“यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.”
– मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान

“यश मिळवणं? अगदी सोपी गोष्ट आहे ही! फक्त योग्य वेळी, योग्य प्रकारे योग्य ती कृती करत राहा.”
– अरनॉल्ड ग्लासो, प्रसिद्ध उद्योजक

“कधीच चुका न करणं म्हणजे यश नाही; तर एकच चूक दुसऱ्यांदा न करणं ही गोष्टच तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जात असते.”
– जॉर्ज बर्नार्ड शॉ, प्रसिद्ध नाटककार

“मनाशी एखादी कल्पना ठरवा. त्यानंतर तुमचं सारं आयुष्य त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी झोकून द्या. मनात फक्त तिचाच विचार असू दे. स्वप्नातही तीच दिसू दे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात ती असू दे. तुमच्या शरीराचा अणू-रेणू त्याच ध्येयाने पछाडलेला असू दे. बाकी साऱ्याचा विचारही सोडून द्या. यशाचा मार्ग हाच आहे.”
– स्वामी विवेकानंद

“जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची यशासाठीची तळमळ अपयशाच्या भीतीपेक्षा कित्येक पटीनं जास्त हवी.”
– बिल कॉस्बी, अभिनेते, लेखक

“ज्यांच्यात प्रचंड अपयश पचवण्याची धमक असते, तेच भव्यदिव्य यश संपादन करू शकतात.”
– रॉबर्ट एफ. केनेडी, राजकीय नेते

“प्रत्येक यशाची गुरुकिल्ली एकच! ती म्हणजे कृती करत राहणं.”
– पाब्लो पिकासो, चित्रकार

“तुम्हाला अमुक एक गोष्ट चांगली आहे किंवा तमुक गोष्टीवर विश्वास ठेवा असं सांगितलं गेलं, तरी तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला स्वत:ला जे ठाऊक आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. त्यावर जेव्हा विश्वास ठेवता तेव्हाच तुमचं तुम्ही भव्य स्वप्न साकारण्याच्या मार्गावर पाऊल ठेवता. यशाचा आविष्कार तुमच्या आतूनच होत असतो.”
– राल्फ वाल्डो इमर्सन, लेखक व कवी

“आपल्या प्रत्येकाच्या स्वत:च्या अशा खास इच्छा असतात. प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे आणि खास तशाच त्या वेगळ्या असतात. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला काय आवडतं, तुमचं कशावर प्रेम आहे, याचा शोध घेणं. त्यानंतर इतरांना सेवा म्हणून ते उत्तम प्रकारे देऊ करणं, खूप कष्ट करणं आणि या विश्वातल्या ऊर्जेच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करणं.”
-ऑप्रा विन फ्रे, टीव्ही शो अ‍ॅन्कर, सामाजिक कार्यकर्त्यां

“अपार कष्ट आपल्या कामाप्रती अविचल निष्ठा आणि आपण जिंकू किंवा अपयशी ठरू याची तमा न बाळगता आपल्या कामात १०० टक्के झोकून देण्याचा, पूर्ण शक्ती लावून ते काम करण्याचा निश्चय या गोष्टीतूनच यश साकारत जातं. म्हणूनच यशस्वी व्यक्ती आणि इतरांच्यातला फरक काय? इतरांकडे क्षमता नसतात, ताकद नसते किंवा ज्ञान नसते असं नाही. पण यशस्वी व्यक्तींमध्ये जी आंतरिक तळमळ आणि इच्छा असते, त्याची कमी इतरांमध्ये असते.”
– विन्सेट (विन्सी) लोम्बार्डी, ख्यातनाम फूटबॉलपटू

“समाजाला हितकारक ठरतील अशा कृती करणं आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणं म्हणजे यश! यावर तुमचा विश्वास असेल, अन् ही व्याख्या तुम्ही मनापासून स्वीकारत असाल, तर ‘यश’ तुमचंच आहे.”
– केली किम

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..