वाढदिवस स्वातंत्र्याचा, जो-तो बघ गात आहे –
‘सर्व लोक खूष येथें , सर्व सुशेगात आहे’ ।।
पुढे पुढे काळ चाले, पुढे पुढे दुनिया जाई
आणि पहा देश अपुला कसा कुठे जात आहे !
कोटि-कोटि देव ठाकत धनवंताच्यासाठी
कोण इथें दीनासाठी ? तो पुरा अनाथ आहे ।।
महापूर-भूकंपांनी जनजीवन नासे पुरतें
फक्त एवढेंच ? बाकी सर्व-सर्व शांत आहे ।।
कितिही आक्रंदा येथें , ढिम्म न कोणी हलतें
हात कटी ठेवुन निर्मम पंढरिचा-नाथ आहे ।।
कुठल्याही विषयामध्ये कितवा-ही असुं दे नंबर
उच्चरवें गर्जूं , ‘भारत पहिला जगात आहे’ ।।
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply