नवीन लेखन...

हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील अभिनेत्री

Indian Actresses of Yesteryears

आपल्या अभिजात अनं नैसर्गिक कलागुणांनी नटलेल्या १९५० ते १९६० या कालखंडातील चित्रतारका या हिंदी चित्रपट सृष्टींच अभिनव लेण ठरले आहेत. भाव-भावनांचे अद्भूत तरंग, सौदर्याची अनं अभिनयाची मोहवून टाकणारी कलांचे विविध पैलू अवीट गोडीचे संगीत आणि निर्सगाचे विलोभनिय नयनरंम्य दर्शन घडविले आहे.

भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे.

प्रेम, विरह, विश्वास, नितीमूल्ये आदी अनेक गुणांच्या माध्यमातून साकारलेल्या या व्यक्तीरेखा अजोड ठरल्या गेल्या आहेत. नायिका नर्गीसने बरसात, जागते रहो, चोरी-चोरी, आह, मदर इंडिया या चित्रपटामधून अल्लड नायिका, असामान्य प्रेमिका आणि आईची भुमिका विलक्षण आत्मीयतेने साकार केल्या.
– नर्गिस-लोकप्रिय नायिका
उभट चेहरा, गालावर पडणारी खळी, चेहर्‍यातील निरागसता आणि अभिनयातील सहजता या नायिकेने सहज सुंदर अभिनयाने प्रकट केली. राजकपूर आणि नर्गीस ही त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय जोडी ठरली. चोरी-चोरी चित्रपटातील प्यार हुवा इकरार हुआ… या गाण्यातील नर्गीसची उत्कटता कधीही न विसरणारी अशी आहे.
मदर इंडियामधील सोशीक आणि करारी आई पाहताना डोळे पाणावतात आणि संकटावर मात करण्याच सामर्थ्य देतात. अशा नर्गीसच्या कारकिर्दीने हिंदी चिंत्रपटांची यशस्वी वाटचाल झाली. त्याच काळात मधुबाला नावाच अप्रतिम सौंदर्य अवतरल. सौंदर्याच आणि मोहकतेच अनोख रुप पाहून तरुणांवर या सौंदर्याची मोहिनी पडली नाही तर काय नवल. मधुबालाला पडद्यावर पाहाण तिच वावरण हे सुध्दा एक आकर्षण वाटायच.
मुगले आझमचा सुवर्ण काळ
मुगले आझम हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. तिने नृत्य, सौंदर्य, अभिनय लिलया साकारला. प्रेमिकेचे सारे भावतरंग तिने मनापासून पेश केले. भुमिका करण्यापेक्षा भुमिकेत जिवंतपणा आणण्याचे तिच्याकडे कौशल्य होते. अशा या मधुबालावर काळ ही फिदा झाला. व्यक्तीगत आयुष्यात परिपुर्णरित्या न जगता ती खुप लवकर या जगातून निघून गेली. प्यार किया तो डरना क्या.. अस म्हणणारी नायिका या जगातून जाताना रसिकांना कायमची हुरहूर लावून गेली.
निर्मळ हसरा चेहरा, अल्लड आणि विनोद बुध्दीने केलेली अदाकारी बोलके डोळे या निसर्गदत्त देणगीने संपन्न असलेली ही नायिका हिदी चित्रपट सृष्टीतील त्या काळातल एक खळाळत चैतन्य होत. तिला आणखी आयुष्य लाभलं असत तर हिंदी चित्रपटाचा काळ भरभराटीला गेला असता.
– मीना कुमारीचा काळ
याच काळात मीना कुमारी नावाच अभिनयाच अजब रसायन दुःखविरह वेदना वियोगाच्या छटामधून अवतिर्ण झाल. ट्रेजिडी क्पीन हे बिरुद तिला लाभल गेलं. साहिब बीबी और गुलाम, दिल एक मंदीर, पाकिजा, वासना या चित्रपटामधून मिना कुमारीची अदाकारी चटका लावून गेली. शब्दापेक्षा डोळ्यातून साकारणारा तिचा अभिनय तिच्या जिवाची झालेली तडफड तिचा आक्रोश सार काही भारावणारं अस होत.
विरह वेदना आणि दुःख हेच तिच व्यक्तीगत आयुष्य असाव की काय आणि तशाच भुमिका तिला मिळाव्यात अस रसिकांना वाटू लागायच. तिच्या आवाजात खर्ज होता. हा खर्ज दर्द प्रकट करायचा तिच्या दुःखाचा आणि विरहाचा आवेग इतका प्रभावी असायचा की नायकांनी तिला आता तरी स्विकाराव तिच दुःख दूर कराव. अस वाटून जायच. अशी ही मीनाकुमारी सर्व प्रकारच्या भुमिका साकारुन अत्पावधीतच स्वतःच्या अभिनयाच्या पाउलखुणा उमटवून पडद्याआड गेली.
वहिदा रेहमान या एक अभिनयाच आणि सौदर्याच एक अनोख दालन होत. सौंदर्य सहज सुंदर अभिनय नृत्य, भावूकता, निरागसता, मार्दव अशा कलागुणांनी नटलेल व्यक्तीमत्व या चित्रपट सृष्टीला दिर्घकाळ लाभलं.
– मेहबुब मेरेची नायिका वहिदा रेहमान
खरखुर नैसर्गिक सौंदर्य असलेल्या या नायिकेने प्रेमिका आई बहिण मैत्रीण अशा व्यक्तीरेखा जिवंत केल्या. भारतीय संकृतीचे पैलू तसेच नात्या नात्यामधील संबध कर्तव्य आणि नैतिकता यांच दर्शन घडल या नायिकेने साकार केलं. महिलावर्गावर त्याचा विशेष प्रभाव पडला. विश्वासू प्रेमिका चेहर्‍यावरील प्रसंन्नता, मधुर हास्य म्हणजे वहिदा रेहमान. काटोंसे खिचके ये आँचल.., रंगिला रे.., मेहबूब मेरे.., गाता रहे मेरा दिल.., अशी अनेक अविट गोडीची गाणी या नायिकेला लाभली आणि या गाण्याच वहिदाने सोन केल. परिपुर्ण भारतीय नारीच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे वहिदा रेहमान.
– तेरा जानाची नायिका नुतन
नुतन ही एक विशेष अभिनेत्री होती. तिने अभिनेत्री, अनाडी, सुजाता या चित्रपटात तीने केलेला अभिनय रसिकांच्या लक्षात राहिला. अत्यंत बोलका चेहरा, अल्लड अवखळपणा तितकीच करारी अनं कर्तव्यनिष्ठ अशी नायिका आपल्या अभिनयातून स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवून गेली. या नायिकेला सुंदर गाणी मिळाली. मिलन चित्रपटातील सुनील दत्त बरोबरची प्रेमिका तिने अजरामर केली. हा चित्रपट एक जिवंत अनुभव देणारा अत्यंत गाजलेला चित्रपट ठरला. सावन का महिना पवन करे शोर…, हम तुम युग युगसेही गीत मिलनके…, तेरा जाना दिलके अरमानोंका मिट जाना…, अशा गाण्यातून नुतन रसिकांच्या स्मरणात राहिली आहे.
अप्सरेसारखे लावण्य मादकता, नृत्य आणि अभिनय याच्या बळावर वैजयंतीमाला तारकेने आपला प्रेक्षकवर्ग तयार केला. तिच्या पदन्यास व पदलालीत्यातून शास्त्रीय नृत्यशैली चित्रपटात आली आणि रसिक खूष झाले. नया दौर, संगम, साथी, संघर्ष, जॉनी मेरा नाम, तलाश या सारख्या चित्रपटातून वैजयंतीने अभिनय व नृत्य यांचे दर्शन घडविले. राजेंद्रकुमार बरोबर साथी याचित्रपटातील तिची भुमिका प्रेम, विरह, त्याग असे सारे मोड तिने साकार केले.
मेरा प्यार भी तू है!
ये बहार भी तू है!
– वैजयंतीमालाचा अभिनय
या गाण्यातील तिची अगतिकता तिची असहाय्यता आदिंनी रसिक भारावून जातात. संगम व तलाश मधील भुमिका तिच्या नृत्य आणि अभिनयाचा कस दाखविणार्‍या होत्या. आम्रपाली या चित्रपटात तर जणू काही अप्सरा अवतरल्याचा भास होतो. नृत्य हेच जीवन मानणारी ही नायिका वयाच्या सत्तरीतही नृत्यांचे कार्यक्रम करते. असंख्य पुरस्काराने विभूषीत अशी ही कलावंत. विद्यादानाचे कार्य उत्साहाने करते.
साधना ही आणखी एक सुंदर नायिकेने प्रेम या विषयावर अधारित असली नकली, एक मुसाफिर एक हसिना, वक्त, आरजू, या रासख्या चित्रपटातून प्रेमिकेच्या रुपात अनेक भुमिका जिवंत केल्या. अत्यंत सुंदर गाणी तिला मिळाली आणि त्या गाण्यांना त्या नायिकेने आपल्या सौदर्यांने अनं उत्कटतेने स्पर्श केला. बेदर्दी बलमा तुझको मेरा मन याद करता है… हे आरजू चित्रपटातील गाण साधनाने आपल्या चेहर्‍यावरील भावाने एका वेगळ्या उंचीवर नेले. साधना कट हा केश भुषेचा प्रकार प्रसिध्द होता.
अशा या हिंदी चित्रपटातील नायिकांनी संस्कार, सौदर्यं, संगीत, शैली अदाकारी मधून हिंदी चित्रपट सृष्टी भरभराटीस नेली. या नायिका रसिकांच्या मनातल्या तर झाल्याच, पण रसिकांची मनेही त्यांनी उन्नत केली. या आणि इतर अशा अनेक नायिकांनी प्रेमिका, आई, बहिण, सासू, सुन अशा वेगवेगळ्या नात्याच्या भुमिका करुन महिलांमध्ये आपुलकीचे स्थान निर्माण केले. भारतीय संस्कृती, संस्कार, नाती व नात्यातील संबध संमृध्द करण्याचे महान कार्य या नायिकांनी रंगवलेल्या व्यक्तीरेखांना निश्चितपणे जाते.
– भारतीय संस्कृतीचे दर्शन
या नायिकांनी आपल्या अंगभुत कलागुणांची मुक्त उधळण चित्रपटातून केली. त्यांची शालिनता ही त्यांच्या देहबोलीतून अन् सौंदर्यातून सहजपणे व्यक्त होत असे. सवंगता, देह प्रदर्शन, नखरेलपणा याचा लवलेशही नसलेल्या अशा त्या काळातील नायिका चित्रपटातील प्रसंगानूरुपही अश्लिल वाटल्या नाहीत.
भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीमधील भारतीय नायकना यका आणि अन्य कलावंतांचे योगदानही रसिकांच्या मनोरंजनाबरोबर संस्कृतीच्या दर्शनाने घडले. जुन्या काळातील या चित्रपटांना हे चित्रपट पाहताना त्यातील श्रवणीय गाणी ऐकताना रसिकांची मने उल्हसित होतात.
दुःखी, कष्टी भ्रांत मनाला शांत करण्याचे काम या चित्रपटांनी केले आहे. अपयशाने खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम सामर्थ्य या चित्रपटाच्या कथानकात, गाण्यात व नायक-नायिकांच्या अभिनयात होते. अजुनही जुन्याकाळातील जुनी गाणी जेष्ठ नागरिक व सध्यांची पिढी ही आनंदाने ऐकत असतात. आपण सर्वांनी या काळात जन्म घेऊन या महान कलावंतांच्या कलेचा आनंद घेतला.
संजय कांबळे – पिंपरी
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..