नवीन लेखन...

भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडर

गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. इंग्रजी कॅलेंडर आपल्या हाडी-मासी इतकं खिळलं आहे की आपण गुढीपाडवा केव्हा आहे असे विचारतो. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा ही तिथी. पण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जे कॅलेंडर रोज वापरतो त्या कॅलेंडरच्या भाषेत हवं असतं. ६ एप्रिलला गुढीपाडवा आहे असं म्हटलं की आपली पेटते !

या घोळातून सुटका करणारं भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडर आहे हे अनेकांना माहितच नाही. त्याचीच माहिती करुन घेऊया या लेखमालेतून.

पंचांग आणि कॅलेंडर

१ जानेवारी २०१९ अशी तारीख सांगणारे कॅलेंडर आपल्या खूप अंगवळणी पडलं आहे. इंग्रजांच्या एकशे पन्नास वर्षाच्या अधिपत्यामुळे ते इथे आलं. आपल्या जुन्या पिढीतील माणसं चैत्र, पौषाच्या भाषेत बोलायची. पितृपंधरवडा म्हटला की, भाद्रपद आठवतो आणि होळी फाल्गुनाची आठवण करून देते.

तिथी-पक्ष असा पेहराव असलेल्या कॅलेंडरला एक सुटसुटीत पर्याय लाभला तो इंग्रजी कॅलेंडरचा. इंग्रजी कॅलेंडरचा व्यवहारातील वापर हा इंग्रजांचे राज्य कारभारामुळे आला, पण खरे तर सुटसुटीतपणामुळे, सोपेपणामुळे विदेशी कॅलेंडर आपण स्वदेशी केले. सर्वच व्यवहारात त्याचा मुक्त वापर सुरू झाला, परंतु सणवार, उत्सवही चंद्रावर आधारित तिथी, पक्ष या चांद्र कालगणनेवर चालतात. चंद्राच्या बारा महिन्यातील दिवस हा तिथीने दर्शविला जातो. तारखेने नव्हे. तिथी म्हटले की, तिची सुरुवात आणि शेवट यांचा संबंध दिवस, रात्रीशी राहत नाही. तारीख जशी रात्री १२ वाजता सुरू होते, तशी तिथी विशिष्ट वेळी सुरू होत नाही आणि ठराविक घड्याळीवेळी संपतही नाही. शिवाय तिथीची वृद्धी आणि क्षय हा एक वेगळाच कुतूहलाचा मामला आहे.

त्यामुळे सण – उत्सवासाठी पंचांग म्हणजे चंद्रावर आधारित कालगणना आणि रोजच्या व्यवहारात सूर्यावर आधारित इंग्रजी कालगणना. धर्म आणि व्यवहार यांचा समन्वय साधणारा असा आपला साधा हिशोब आहे. त्यात गैर काहीच नाही.

— हेमंत मोने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..