नवीन लेखन...

पॅराकमांडोजचे शौर्य – भारताचे भूषण

Indian ParaCommandos - The Crowns of Indian Army

काश्मिरमधे या वर्षात १३७ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ७१ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.१९८८- २०१६ या कालावधीमध्ये ३०,७७२ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ९८३९ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.

पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवरील शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महाराष्ट्रातील सांगलीतील जवान नितीन सुभाष कोळी शनिवार सकाळी हुतात्मा झाले.कर्तव्य बजावत असलेले जवान आपले रक्षण करत असल्यामुळे आपण येथे आनंदात दिवाळी साजरी करू शकतो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “यंदाची दिवाळी जवनांना समर्पित करा‘ असे आवाहन ३० ऑक्टोबर २०१६ रोजी  “मन की बात‘ या कार्यक्रमाद्वारे केले.

जगातील सर्वात कठीण समजल्या जाणा-या जागतिक स्तरावर होणार्‍या कंमांडो कॅब्रियन पट्रोल सरावात भारतीय सैन्याच्या जवानांनी सुवर्ण पदक पटकावले आहेत.

अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक हे आठ ठिकाणी कुपवाडा, पुरी, नवशेरा,केजी(जिथे मी एका ब्रिगेडचे नेत्रुत्व केले होते) या भागासमोर असलेल्या पाकिस्तानच्या दहशतवादी लॉचपॅड वर करण्यात आले होते. या स्ट्राईकमध्ये सामील झालेले सैनिक इन्फंट्री बटालियन चे घातक प्लाटून आणि सैन्याच्या स्पेशल फोर्सेस म्हणजे भारतीय पॅराकंमांडो बटालियनचे होते.

कमांडो विंगची १९७१ च्या युध्दात महत्वाची भुमिका

प्रत्येक इन्फंट्री बटालियन त्यात साडे आठशे सैनिक असतात त्यामध्ये एक घातक प्लाटून म्हणजे कमांडो दस्ता तयार असतो. कमांडो प्लाटूनला कमांडो कोर्स करणे अनिवार्य असते व त्याशिवाय त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. कमांडोंचे खडतर प्रशिक्षण कसे असते याचे चित्रीकरण आपल्याला नाना पाटेकर यांच्या प्रहार या सिनेमात पहायला मिळते, ज्यामध्ये मराठा रेजिमेंटचे चित्रण व बेळगावात कमांडो विंग मधले प्रशिक्षण आपण पाहू शकतो.

सहा बिहार, दहा डोगरा आणि इतर कमांडो प्लाटूननी या स्ट्राईकमध्ये सहभाग घेतला होता. सहा बिहार , दहा डोगरा बटालियनचे उरीमध्ये हल्यात १९ जवान शहीद झाले होते. त्यामुळे या दोन्ही बटालियनसच्या कमांडो प्लाटूनचा या हल्ल्यात मुद्दाम समावेश केला गेला.आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा जबाब देण्यासाठी त्यांना मदत मिळाली.

सीमापार करतांना जिवंत परत येण्याची शक्यता फ़ार कमी

मुख्य हल्ले हे नाईन पॅरा स्पेशल फोर्सेस (९ PARA SF)आणि फ़ोर पॅरा स्पेशल फोर्सेस(४ PARA SF) या बटालयिन्सच्या अधिकारी आणि सैनिकांनी केले आहेत. हे सैनिक मरून रंगाची बेरे कॅप घालतात व त्यांच्या छातीवर बलिदान नावाचा एक बॅच लावलेला असतो. पॅराकमांडोंना अतिशय कठीण प्रशिक्षणातून बाहेर पडावे लागते. पॅराकमांडोचा सैनिक ज्यावेळी सीमापार करतो तेव्हा त्याला जिवंत परत येण्याची शक्यता फ़ार कमी आहे याची कल्पना असते. सीमापार करतांना आपला जीवनाचा पट डोळ्यांसमोरून येऊन जातो.बहुतेक सैनिक आपल्या नातेवाइकांना करता आपले शेवटचे पत्र पण लिहुन ठेवतात .जर ते परत आले नाही तर ते पत्र त्यांच्या नातेवाईकांना पाठवले जाते. पॅराकंमाडोची निर्णय क्षमता, शारिरीक क्षमता, मानसिक क्षमता अत्त्युच्च दर्जाची लागते. पॅराकमांडो बटालियनमध्ये येण्यासाठी भारतीय सैन्याच्या इन्फंट्री बटालियन्समधील सैनिक, अधिकारी इथे येऊ शकतात.

सातार्‍याचे शौर्य चक्र विजेते कर्नल संतोष महाडिक यांचा काश्मिरमधील कुपवाडामध्ये मृत्यू झाला. त्यांनीही दोन स्पेशल फोर्सेस बटालियनचे नेतृत्त्व केले होते.

देशाकरीत प्राण देण्यासाठी कधीही तयार

सर्वात पहिले प्रशिक्षण हे ९० दिवसांचे असते. पहिल्या दोन आठवड्यातच पन्नास टक्के सैनिक हे कठिण ट्रेनिग करु शकत नाही म्हणून बाहेर पडतात. त्यापुढील दोन आठवड्यात आणखी २५ टक्के सैनिक बाद केले जातात. शेवटी तीन महिन्यात केवळ वीस टक्के सर्वात चांगले सैनिक टिकून राहतात. ज्यावेळी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते त्याचवेळेला त्याना छातीवर बलिदान बॅच लावता येतो. या बॅचमध्ये पॅराकमांडोचे पंख आण सुरा(Dagger) असे चित्र असते. याचा अर्थ असा की तुम्ही देशाकरीत प्राण देण्यासाठी कधीही तयार आहात.

पॅराकमांडोजची शारिरीक क्षमता उच्च दर्जाची असते. दहा किलोमीटरपासून साठ किलोमीटर पर्यंतचे अंतर शरीराच्या वजनाच्या निम्मे वजन पाठीवर घेऊन रात्रीच्या वेळेला पळावे लागते. रात्रीच्या वेळेला आपण न दिसता शत्रुला हुडकून काढणे हे देखील करायचे असते. या प्रशिक्षणाचा दर्जा इतका उच्च आणि कष्टाचा असतो की सैनिक पुरता थकून गेलेला असतो. पण त्यामुळे उच्च दर्जाची शारिरीक व मानसिक क्षमता हासिल करता येते. या प्रशिक्षणादरम्यान कमीत कमी पाण्यावर कसे जगायचे, उपाशी राहुन सुध्दा हल्ले कसे करायचे , शत्रुवर हल्ला कधी व केंव्हा करायचा, शस्त्राचा वापर कसा केव्हा करायचा असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये डोंगराच्या कठीण भागातून जाणे, जंगलात लपून राहणे, शत्रुवर स्फोटक पदार्थांचा वापर करुन हल्ला करणे, अनआर्म्ड कॉम्बॅट, रात्रीच्या वेळेला रस्ता शोधणे किंवा आकाशातील तार्‍यांच्या मदतीने लक्ष्य गाठणे, या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

फ्री फॉलच्या मदतीने हल्ले

पॅराकमांडोजना पॅराशूटच्या मदतीने सुद्धा विमानातून उड्या माराव्या लागतात. अतिशय उंचीवरून पॅराशूटच्या मदतीने उडी मारली जाते. त्यातील तीन चतुर्थांश अंतर फ्री फॉलच्या मदतीने खाली उतरावे लागते. एक हजार फूट उंचीवर पोहोचल्यावर पॅराशूट उघडण्यात येते. याला हॅलो ऑपरेशन म्हटले जाते. यावेळच्या सर्जिकल स्ट्राईकवेळीही हॅलो ऑपरेशनचा वापर केला गेला होता, असे वर्तमानपत्रामध्ये आले आहे. पॅराशुटच्या मदतीने शत्रुच्या गोटात प्रवास हे पॅराकमांडोज करतात. आपल्या लक्ष्याच्या जवळ पोचल्यावर एक ते दोन किलोमीटर अंतरावर उतरून, पायी शत्रुच्या वर हल्ला केला जातो.

लक्ष्य दृष्टीक्षेपात आल्यावर आपल्याकडील अधुनिक शस्त्रांच्या जसे रायफल, लाईट मशीन गन, बॉम्ब, रॉकेट लॉचर च्या मदतीने शत्रुचे तळ बरबाद केले जातात. लक्ष्य उद्धवस्त केल्यानंतर आपले पॅराकमांडो वेगळ्या रस्त्याने लपतछपतच परत आपल्या भूभागावर परत येतात. काही वेळा आपल्या हेलिकॉप्टरचा वापर करुन सैनिकांना परत आणता येते. सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री आपल्या सैनिकांनी रात्री ११.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ही कारवाई केली. दहशतवादी लॉचपॅड म्हणजे एलओसीमधील काही खेड्यांमध्ये पंचवीस ते तीस दहशतवादी भारतात प्रवेश करण्याकरिता लपले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना कंठस्नान घातल्यानंतर आपली घातक प्लाटू़न आणि पॅराकमांडोज आपल्या भूभागात परतले.

पॅराकमांडोज हे देशाचे महत्त्वाचे शस्त्र

पॅराकमांडोजचे प्रशिक्षण किती कठीण आहे त्यांनी आत्तापर्यंत काय केले याची अत्यल्प माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचली आहे. वर्तमानपत्रातही त्याविष़यी फार कमी माहिती आली आहे. पॅराकमांडोज हे देशाचे महत्त्वाचे शस्त्र आहे. त्यांना आपण सर्व अधुनीक शस्त्रसामग्री देऊन तयार ठेवले पाहिजे. या सैनिकांविषयी फार माहिती दिली जात नाही. पण हे सैनिक आपले काम करुन आपल्या बराकीत येतात तेव्हा त्यांच्या नजरेस टीव्हीवर चाललेल्या चर्चा आणि वर्तमानपत्रातील बातम्या वाचायला मिळतात. सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका घेणे आणि सैनिकांचे मनोबल खालावेल अशा पद्धतीने चर्चा क़रणे नक्कीच टाळले पाहिजे.

आपल्या स्पेशल फोर्सेस या नक्कीच अत्त्युच्च दर्जाच्या आहेत. गरज लागेल तेव्हा पुन्हा ते देशासाठी नक्कीच लढतील पण एका सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानने चालवलेला दहशतवाद संपणार नाही. तो संपवण्यासाठी असे हल्ले भविष्यातही करावे लागतील. यापुढेही पॅराकमांडोज असलेल्या प्रत्येक सैनिकाला, अधिकार्याला अनेक शूरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २६-११ ला झालेल्या हल्ल्यात दहा दहशतवाद्यांपैकी आठ जणांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजीने मारले. हे सर्व सैनिक पॅराकमांडो आणि इन्फंट्री बटालियन मधून आलेले सैनिक आणि अधिकारी हेच होते.

कठीण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सैनिकांना जखमा होतात, अनेकांना हातपाय तुटतात अनेक जणं कायमचे सैन्यातून बाहेर पडतात असे अनेक पॅराकमांडो आर्टिफिशियल लिंब सेंटर पुण्यातल्या पॅराप्लाजिक होम खडकी येथे आहेत. त्यांना आता पर्यंत ७ अशोक चक्र,११ महाविर चक्र,६१ विर चक्र,१३ किर्ती चक्र,५३ शौर्य चक्र,१० युध्दा सेवा शौर्य पदकाने गौरवण्यात आले आहे, म्हणून अशा उच्च दर्जाच्या सैनिकांचे कौतुक करणे गरजेचे आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..