इ.स. १८५३ मध्ये भारतीय रेल्वेचा शुभारंभ मुंबई ठाणे रेल्वेने झाला आणि त्यानंतर सन १८५४ मध्ये हावरा हूगळी मार्ग सुरू झाला. कलकत्त्यामध्ये १८४५ पासून रेल्वे उभारणीचे वारे वाहत होते. अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांनी पैसे उभारण्यास सुरुवात केली होती. इंग्लंड मध्ये भारतीय रेल्वेच्या वार्तेमुळे सर्व थरांतील नागरिक थक्क झाले होते. भारतात भारतीय रेल्वेने भांडवल उभारण्याकरिता काढलेले शेअर्स बाजारात हातोहात खपले होते व त्यामध्ये सर्व थरांतील नागरिकांनी पैसे गुंतविले होते. हा एक जगप्रसिद्ध प्रकल्प होणार अशी प्रत्येकाला खात्री वाटत होती. भारतातील प्रदेशांची विविधता व विषम हवामान, यामुळे रेल्वे बांधणीत नाना तर्हेच्या अडचणी येणार याची लॉर्ड डलहौसींंना कल्पना होती, परंतु त्यांची दूरदृष्टी इतकी अचूक होती, कि या रेल्वे बांधणीमुळे इंग्लंडचा फायदा तर होईलच, पण भारतातही औद्योगिक क्रांती घडून भारताची प्रचंड वेगाने प्रगती होईल याबाबत त्यांची बालंबाल खात्री होती. या खात्रीतुनच त्यांनी रेल्वे बांधणीची सुरुवात केली. इंग्लंड मध्ये रेल्वे शेअर्स घेण्याची हावया शीर्षकाची एक कविता त्यासुमारास एका नामांकित वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाली होती.
सन १८५६ व १८५७ या दोन वर्षात भारतीय स्वातंत्र्य युद्धामुळे राज्यकर्त्यांना चांगलाच हादरा बसला. त्याचा परिणाम रेल्वे बांधणीवर झाला आणि कामकाज थंडावत चाललं; परंतु पुढे या घटनेच्या परिणामी ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्य कारभार पूर्णपणे ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली आला. संपूर्ण देशावर इंग्रजांची जबरदस्त पकड बसली व रेल्वे बांधणीला पुन्हा एकदा जोरात चालना मिळाली.
सन १८५९ पर्यंत मद्रास, अलाहाबाद, कानपूर, अमृतसर, अटारी, ते थेट लाहोर या ठिकाणांपर्यंत रेल्वेचं जाळं पसरू लागलं. सन १८६५ ते १८७० या दरम्यान थळ आणि बोरघाट ( कसारा व खंडाळा ) या अवघड घाटांचं बांधकाम झालं. ही जगातील रेल्वे बांधणीतील सर्वात उच्च प्रतीची बांधकाम ठरल्यामुळे भारतातील रेल्वे बांधणी संबंधी सर्वत्र प्रशांत सत्कार काढले जाऊ लागले. मुंबईपासून उत्तर, पश्चिम, पूर्व व दक्षिणेकडील मार्ग सुरू झाले. सन १८८२ पर्यंत थेट दिब्रुगड पर्यंत आसामबांधणी पूर्ण झाली. रेल्वे बांधणीच्या यशाची पताका फडकावली गेली. त्या रेल्वे बांधणी दरम्यान काही दुर्घटनांचा सामनाही करावा लागला. अगदी सुरुवातीच्या काळातील पहिली दुर्घटना म्हणजे इंग्लंड होऊन बोटीने रेल्वेचे डबे येत असताना ती बोटच समुद्रात बुडाली; दुसरी अशीच एक दुर्घटना अशी, की भारताकडे येण्यास निघालेलं पहिलं इंजिन भारतात न येता चुकून ऑस्ट्रेलियाकडे रवाना झालं.
भुसावळ ते जबलपूर या ३३९ मैलांच्या रेल्वे मार्गाचं बांधकाम घनदाट जंगलातून करणं हे जबरदस्त आव्हान होतं. या ठिकाणी वाघ, बिबट्यांसारखी जंगली श्वापदं, मलेरिया सारखा रोग, आणि नर्मदेच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह या तीन गंभीर समस्या होत्या. या समस्यांवर मातकरीत नर्मदा नदीवर पूल बांधला गेला व कलकत्ता व दिल्ली या शहरांशी मुंबई जोडली गेली. सन १८७० मध्ये रेल्वे बांधणीचा खर्च प्रत्येक मैल अंतरासाठी १७,००० पौंड इतका झाला.
१९२५ साली रेल्वेने हनुमान उडी घेत विजेवर चालणारी पहिली लोकल मुंबई कुर्ला हार्बर लाईनवर सुरू केली. यापुढील काळात इ.सन. १९३७ पर्यंत ब्रह्मदेश हा भारताचाच भाग होता. त्यामुळे रंगून, मंडाले, कुमलॉंग ही रेल्वे बांधणी पूर्ण करण्यात आली. सिलोन मधील कोलंबो हे शहर भारताच्या धनुष्यकोडी पर्यंत बोटीने व पुढे रेल्वेमार्गाने भारताला जोडलं गेलं.
दुष्काळात दुर्गम प्रदेशात धान्य पोहोचविण्याची जबाबदारी रेल्वेने घेतल्यामुळे हजारो लोकांना धान्य मिळालं. दुर्गम अशा प्रदेशांत पर्यंत जवळजवळ ५,००० मैल रेल्वेमार्ग नेण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले तेव्हा सैन्य व युद्धसामग्री हलविण्याकरता रेल्वेवर बराच बोजा पडला. त्यातच रेल्वेची इंजिनं स्वल्पविराम मालगाडीचे डबे, मध्य आशियात पाठवावे लागले. भारतातील २६ छोटे मार्ग बंद करावे लागले. रेल्वे कारखान्यात युद्धसामुग्री बनवावी लागली. वायव्य सरहद्द प्रांतात रेल्वे थोड्याच भागात पोहोचली होती, त्यामुळे अफगाणिस्तानकडे लक्ष पुरविता आलं नाही. दुसऱ्या महायुद्धापाठोपाठ १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, परंतु फाळणी झाल्याने रेल्वे मालमत्तेची विभागणी करावी लागली व काही मार्ग बंद करावे लागले.
१९४८ सालापर्यंत अनेक संस्थानं आणि मुख्य रेल्वे मिळून ४२ लहान मोठे रेल्वे गट होते. त्या सर्वांमध्ये सुसूत्रीकरण नव्हतं; त्यामुळे चांगली कार्यक्षमता नव्हती व देशाच्या अर्थव्यवस्थेत योग्य भर पडत नव्हती. यांमध्ये १३ वर्ग प्रथम दर्जाचे, १० वर्ग दुसऱ्या दर्जाचे, १९ वर्ग तिसर्या दर्जाचे असे वर्गीकरण केलेले मार्ग होते. यांमधील ३२ मार्गांचा अधिकार संस्थानिकांचा होता. सांगली संस्थानाचे ५ महिला इतकी छोटी लाईन, तर निजामाच्या राज्यात १,३९६ मैलांचा रेल्वेमार्ग त्यांच्या मालकीचा होता. एकूण ३५,००० मैल लांबीच्या मार्गांपैकी ७,५५९ मैलाचा रेल्वे मार्ग संस्थानिकांच्या हातात होता.
इ.सन. १९५२ सालापर्यंत या सर्व भारतीय रेल्वे मार्गांचे राष्ट्रीयीकरण झालं. त्यानुसार सेंट्रल, वेस्टर्न, साऊथ, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट ( मध्य/पश्चिम/दक्षिण/उत्तर,उत्तर-पूर्व ) असे विभाग करण्यात आले. या विलीनीकरणाने भारतीय रेल्वे ही एक महान राष्ट्रीय संपत्ती म्हणून गणली जाऊ लागली.
Leave a Reply