नवीन लेखन...

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना दिवस

१ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना एक खासगी संस्था म्हणून करण्यात आली होती. भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रोब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकातून घेतल्या गेलेल्या आहेत, बाबासाहेबांनी सादर काम मार्गदर्शक सूचनांनुसार संकल्पना असताना, केंद्रीय विधानसभा सादर मार्गदर्शक तत्त्वे या मार्गदर्शक तत्त्वे पार आधारित संकल्पना होते.

१९४९ पर्यंत या केंद्रीय बँकेचे राष्ट्री यकरण झालेले नव्हते. आर्थिक देशात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष समजले जाते. मात्र, रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे आर्थिक वर्ष १ जुलै व ३० जून असे मानले जाते. रिझर्व बॅंक ऑफ इंडियातर्फे देशाच्या चलनी नोटांची छपाई केली जाते. नाणे बनवण्याचे काम भारत सरकारद्वारा केले जाते. के.जे.उडेशी बनल्या पहिली महिला डेप्युटी गव्हर्नर रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर बनण्याचा मान के.जे.उडेशी यांना मिळाला आहे. २००३ मध्ये उडेशी यांची नियुक्ती झाली होती. पाच व दहा हजारच्या नोटा देखील छापल्या. रिझर्व बॅंकेने ५००० व १०००० रुपये मुल्य असलेल्या नोटांची छपाई १९३८ मध्ये केली होती. यानंतर १९५४ व १९७८ मध्येही या नोटांची छपाई करण्यात आली होती. रिझर्व बॅंक भारताशिवाय पाकिस्तांन व म्यानमारमध्ये सेंट्रल बॅंकेच्या रुपात आपली भूमिका पार पाडत आहे.

आरबीआयने जुलै १९४८ पर्यंत पाकिस्तायन व एप्रिल १९४७ पर्यंत म्यानमारमध्ये (वर्मा) सेंट्रल बॅंकेच्या रुपात काम केले. सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०जून १९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. त्यानंतर सरय जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१ जुलै १९३७ ते दि. १७ फेब्रुवारी १९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर, ते ११ ऑगस्ट १९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले. आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. १९३५ पासून २००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. २०१३ पासून या पदावर रघुराम राजन गव्हर्नर म्हणून होते. २०१६ पासून उर्जीत पटेल यांनी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.

भारतात केंद्रीय बॅंक अर्थात रिझर्व बॅंक ऑफ इंडियाची (आरबीआय) स्थाळपना ‘हिल्टंन यंग कमिशन’च्या आधारावर झाली होती.रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये व्दितीय श्रेणीचे कर्मचारी नाहीत. प्रथम श्रेणीत, तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीत एकूण १७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात मॉनिटरी म्युझियम (मुद्रा संग्रहालय) आहे. रिझर्व बँकेचा लोगो ईस्टय इंडिया कंपनीच्या डबल शिक्क्याने प्रेरित आहे. त्यात थोडा बदल करण्यावत आला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on भारतीय रिझर्व बँकेची स्थापना दिवस

  1. भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय?आणि किती?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..