भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांचा जन्म २२ मे १९४० रोजी बेंगलुरू येथे झाला.
१९७० च्या दशकातील इरापल्ली प्रसन्ना हे भारतीय क्रिकेटमधील जगविख्यात वेंकटराघवन, बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर या चौकडी पैकी एक.
इरापल्ली प्रसन्ना यांच्या बॉलिंगचा टेरर इयान चॅपलपासून गॅरी सोबर्ससारख्या दिग्गज बॅट्समनमध्ये होता. इरापल्ली प्रसन्ना यांचा जन्म म्हैसूरमधील एका कर्मठ कुटुंबात झाला होता. शिक्षणाची त्यांच्या घरात मोठीच परंपरा होती. त्याचे आजोबा इरापल्ली रामा राव हे पहिल्या पिढीचे पदवीधर. प्रसन्ना यांचे वडील ब्रिटीशांच्या काळापासून सरकारी नोकरीत होते. त्यांचे बाकीचे दोन्ही काका सुद्धा डबल पदवीधारक आणि सरकारी नोकरीत होते. त्यांचे लहान काका “कृष्णास्वामी” हे म्हैसूर संघाकडून चांगला क्रिकेट खेळायचे पण क्रिकेट हा खेळ प्रोफेशन म्हणून स्वीकारणे हे त्या काळात तरी इरापल्ली यांच्या कुटुंबाच्या स्वप्नात देखील नव्हते. प्रसन्ना यांनी क्रिकेट खेळायला सुरु केलं तेव्हा सुरुवातीला तर त्याच्या वडिलांनी म्हणजेच इरापल्ली अनंतराव यांनी विरोध केला नाही. प्रसन्ना म्हैसूरमध्ये क्रिकेट खेळू लागले. त्याचं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नांव होऊ लागलं होतं. त्याच्या याच कामगिरीच्या आधारावर १९६१ साली इंग्लडची टीम जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आली तेव्हा या दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात प्रसन्ना यांची निवड झाली तेव्हा इरापल्ली प्रसन्ना तेव्हा म्हैसूर येथील ‘नॅशनल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’ मध्ये पहिल्या वर्षात शिकत होते. इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यात इरापल्ली प्रसन्ना यांचे पदार्पण झाले. तोपर्यंत देखील काही प्रश्न नव्हता, पण खरा प्रश्न उभा राहिला तो त्यानंतरच्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या दौऱ्याच्या वेळी अडचण अशी होती की आता भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार होता. त्याकाळातले ओव्हरसीज दौरे दीर्घकाळ चालायचे. हा दौरा देखील साधारणतः २ महिने चालणार होता. त्यामुळे इरापल्ली प्रसन्नाच्या वेस्ट इंडीजला जाण्यासाठी बाबांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. वेस्ट इंडीज दौरा म्हणजे एका अर्थी प्रसन्ना यांनी इंजिनियरिंग की क्रिकेट’ या दोहोंपैकी एकाची निवड करायची होती. इंजिनियरिंगची निवड प्रसन्ना यांच्यासाठी त्याच्या बाबांनी केली होती प्रसन्ना यांच्यासाठी तर ही तर गुगलीच होती. कारण अशी संधी फारच कमी लोकांना मिळते. प्रसन्ना यांना ती मिळाली होती, पण आता वडील आडकाठी करत होते. पण प्रसन्ना हे काही आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हते.
भारतीय टीमला मात्र प्रसन्ना यांची आवश्यकता होती, त्यामुळे बीसीसीआयचे तत्कालीन सचिव एम.चिन्नास्वामी प्रसन्ना यांच्या घरी गेले. त्यांनी बाबांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. मात्र अनंतराव काही आपल्या निश्चयापासून ढळायला तयार नव्हते. त्याकाळात क्रिकेटची एक मॅच खेळल्यास ५ रुपये मिळायचे. इतक्या तुटपुंज्या पैशावर हा बेभरवश्याचा प्रोफेशन निवडणे म्हणजे आपल्या पोराच्या भविष्याचा जुगार खेळण्यासारखं आहे, असं इरापल्ली अनंतराव यांच मत होतं.
अशा संकटसमयी चिन्नास्वामी यांनी आपलं अखेरचं अस्त्र बाहेर काढलं. देशभक्ती.
चिन्नास्वामी यांच्या ‘देशाला प्रसन्ना यांची गरज असताना, तुम्ही माघार घेणं बरं नाही’ या अर्ग्युमेंटसमोर अनंतरावांचं काहीच चालेना. शेवटी या परिस्थितीतून एक मधला मार्ग काढण्यात आला.
अनंतरावांनी प्रसन्ना यांना वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याची परवानगी तर दिली, पण ती एका अटीवर. अट अशी होती की, प्रसन्ना यांनी त्या दौऱ्यानंतर क्रिकेट बंद करून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करायचं. प्रसन्ना त्यात सुद्धा खुश होते. पुढचं पुढे बघता येईल. दौऱ्यावरून आल्यावर वडीलांची समजूत काढता येईल असा विचार त्यांनी केला आणि ते वेस्ट इंडीजला गेले. नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. वडिलांची अट मान्य करून वेस्ट इंडिजला गेलेले प्रसन्ना ज्यावेळी दौऱ्यावरून परतला त्यावेळी मात्र त्याला एक अतिशय वाईट बातमी समजली. त्यांच्या वडीलांचं निधन झालं होतं. प्रसन्ना आतून हादरूनच गेले. त्याचे वडील त्यांच्यासाठी सगळं काही होते. त्यामुळे त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून दिलं आणि आपलं पूर्ण लक्ष देऊन इंजिनियरिंगच्या अभ्यासावर केंद्रित केलं. पुढची पाच वर्षे प्रसन्ना क्रिकेटपासून दूर राहिले आणि क्रिकेटमध्ये परतले ते इंजिनिअरींगची पदवी पूर्ण करूनच. ५ वर्षांचा काळ क्रिकेटच्या दृष्टीकोनातून खूप मोठा असतो. एवढ्या काळात अनेक जणांचं क्रिकेटिंग करीअर सुरु होऊन संपून देखील जातं. कधीकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या जिद्दी प्रसन्ना यांनी परत डोमेस्टिक क्रिकेट पासून सुरवात केली. एक नवी सुरुवात. प्रसन्ना स्पिनर म्हणून घातक होतेच पण तो जेव्हा परत भारतीय संघात निवडला गेले त्यावेळी ते अजून धारदार बनला होता. पुनरागमनाच्या आपल्या पहिल्याच मॅचच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ८ विकेट्स काढल्या. त्यांच्या जास्त न वळणाऱ्या स्लो बॉलिंगची जादूच अशी काही होती की ज्या वेस्ट इंडीज, न्युजीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये आपण उभे पण राहू शकत नव्हतो त्या देशात आपण जिंकायला लागलो.
प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला.
प्रसन्ना यांच्या क्रिकेटिंग करिअरने अशी काही गती मिळवली की अल्पावधीतच सत्तरच्या दशकातला सर्वात बेस्ट बॉलर म्हणून प्रसन्ना उदयास आले. जगभारातले दादा बॅटसमन त्यावेळी भारताच्या बेदी-चंद्रशेखर-प्रसन्ना आणि वेंकटराघवन या चौकडीच्या तालावर नाचायचे. आपल्या १६ वर्षाच्या कारकीर्दीत इरापल्ली प्रसन्ना यांनी ४९ सामन्यांत १८९ विकेट्स घेतल्या. सामन्यांत दहा विकेट्स घेण्याची करामत त्यांनी दोनदा साधली. प्रसन्ना हे अस्सल ऑफस्पिनर होते. चेंडूला भरपूर उंची द्यायला ते कधी कचरले नाहीत. त्यांना बाउन्सरही छान मिळायचा. त्यांच्या सर्वोत्तम सहा कामगिरींपैकी पाच देशाबाहेर झालेल्या आहेत. प्रसन्ना यांच्या बाबतीत असं सांगतात की तो मैदानात क्रिकेट न खेळता बुद्धिबळ खेळायचा. त्याने आखलेल्या व्युहात बॅट्समन हमखास अडकायचाच अडकायचा. गंमत अशी की खुद्द प्रसन्ना यांनीच आपल्या या खुबीचं क्रेडीट आपल्या इंजिनियरिंगच्या शिक्षणाला दिलंय.
प्रसन्ना यांच्या मते, इंजिनिअरींगच्याच शिक्षणाने त्यांना खेळामागचं सायन्स, बायोमेकॅनिक्स,एरोडायनामिक्स समजून घ्यायला मदत झाली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply