भारतीय कसोटी पंच स्वरूप किशन यांचा जन्म. १३ जुलै १९३० रोजी झाला. मूळचे काश्मीरी स्वरूप किशन हे अंगाने चांगले जाडजूड होते त्यामुळे त्यामुळे त्यांचा चेहरा कायम लालबुंद. त्यांचे आडनाव रिऊ होते. सुरुवातीला ते दिल्ली युनिव्हसीटी कडून कडून क्रिकेट खेळायचे. त्याच बरोबर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांनी ऑडीटर जनरल मध्ये नोकरी पण केली.
स्वरूप किशन हे फारच अंधश्रद्धाळू होते. मैदानात शिरताना सहका-याने ‘बेस्ट ऑफ लक’ असे म्हटलेच पाहिजे. नाही तर दिवस चांगला जात नाही, असे ते म्हणायचे.
भारतीय आणि परदेशी खेळाडूंना ‘लेग स्टंप गार्ड’ देण्याची त्यांची पद्धत औरच होती. भारतीयांना मान हलवून तर परदेशींना बोट वर करून ‘लेग’ देत. असे का, हे विचारताच भारतीयांना ‘जपून रहा’ तर इतरांस ‘बाद हो’ असे मनात म्हणायचो, असे ते सांगत. प्रत्येक चेंडू टाकण्याआधी (गोलंदाजाने) टोपीला हात लावून ‘देवा सर्व निर्णय माझ्या सहका-याकडे जाऊ दे, माझ्याकडे नको’ अशी मनात भावना ठेवत. स्वरूप किशन यांचे २१ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९३२२४०१७३३
पुणे.
Leave a Reply