भारताचे पहिले क्रिकेटपटू रणजीतसिंह यांचा जन्म १० सप्टेंबर १८७२ रोजी नवानगर येथे झाला.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळालेला रणजीतसिंह हे भारताचा पहिले क्रिकेटपटू होता. रणजीतसिंह हे भारतीय क्रिकेटचा जन्मदाता मानले जातात. रणजीतसिंहजी हे इंग्लंड, लंडन कौंटी आणि ससेक्सतर्फे क्रिकेट खेळले. रणजीतसिंह यांनी जुलै १८९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या डावात १५४ धावा केल्या, या हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७८० धावा केल्या आणि डब्ल्यूजी ग्रेसचा विक्रम मोडला होता.३०७ डोमेस्टिक सामन्यांत रणजीतसिंहजी यांनी २४ हजार ६२९ धावा फटकावल्या. त्यात ७२ शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे. १८९९ आणि १९०० या दोन सलग मोसमांत त्यांनी तीन हजार धावा केल्या. १५ कसोटी सामन्यांत त्यांनी ४४.९५च्या सरासरीने ९८९ धावा केल्या. त्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके आहेत. कसोटीतील एका सत्रात शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज आहेत. रणजीतसिंह यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा पहिला आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळले. शेवटच्या सामन्यात रणजीतसिंह यांना काही खास करता आले नाही. या सामन्यात रणजीतसिंह यांनी केवळ सहा धावा करता आल्या. १९०४ मध्ये रणजीतसिंह भारतात परतला. रणजीतसिंह यांचे क्रिकेटवर इतके प्रेम होते की वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे होते. १९०७ मध्ये रणजीतसिंह नवानगरचे महाराजा झाले. एका चांगल्या क्रिकेटपटूप्रमाणे ते एक चांगला प्रशासकही होते. रणजी करंडक भारताने १९३४ मध्ये रणजीतसिंह यांच्या नावाने सुरू केले.
रणजीतसिंह यांचे २ एप्रिल १९३३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply