नवीन लेखन...

भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी

५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.

फातिमा बिबी यांचा जन्म पतनमतिट्टा, त्र्यावणकोर आताचे केरळ येथे ३० एप्रिल १९२७ रोजी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव मीर साहिब तर आईचे नाव ख़दीजा बिबी आहे. फातिमा यांनी त्यांचे शालेय शिक्षण टाऊन स्कूल आणि कॅथोलिकेट हायस्कूल, पठाणमथिट्टा येथे पूर्ण करुन तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी मधून रसायनशास्त्रात बीएससी पदवी मिळवली. पुढे त्यांनी तिरुवनंतपुरम मधील शासकीय विधी महविद्यालयातून आपली बीएल ची पदवी प्राप्त केली.

१४ नोव्हेंबर १९५० रोजी त्या वकील म्हणून दाखल झाल्या. १९५० सालच्या बार कौंन्सिलींगच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. केरळमधील खालच्या न्यायव्यवस्ठेत त्यांंनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९५८ साली त्यांना केरळ सब-ऑर्डीनेट ज्युडीशिअल सर्व्हिसेसमध्ये मुनसिफ म्हणून नियुक्त केले गेले. १९६८ मध्ये त्यांची उप समन्वयक न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. १९७२ सालात त्या मुख्य न्यायदंंडाधिकारी झाल्या व १९७४ साली जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. पुढे जानेवारी १९८० मध्ये प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाची न्यायिक सभासद म्हणून त्यांची नेमणूक झाली. ४ ऑगस्ट १९८३ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदभार स्विकारला. पुढे १४ मे १९८४ मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या स्ठायी न्यायाधीश बनल्या २४ एप्रिल १९८९ ला त्या उच्च न्यायालयाच्या स्ठायी न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाल्या, परंतु पुढे लगेचच ऑक्टोबर महिन्यातील ५ तारखेला त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या. हा पदभार त्यांनी २९ एप्रिल १९९२ पर्यंत सांंभाळून त्या सेवानिवृत्त झाल्या.

२५ जानेवारी १९९७ रोजी त्या तामिळनाडूच्या राज्यपाल झाल्या. राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी राजीव गांंधी हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४ कैद्यांनी केलेल्या दया याचिका फेटाळल्या.

१९९० सालात त्यांना मा. डी लिट, महिला शिरोमणी या पुरस्काराने गौरविण्यात आलं व पुढे कालांतराने त्यांना भारत ज्योती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलंं.

— आदित्य दि. संभूस

 

#FirstLadyJudge #Indian #5thOctober1989

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..