देशाच्या पहिल्या महिला पायलट, ज्यांनी साडी नेसून उडवले विमान सरला ठकराल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९१४ रोजी दिल्ली येथे झाला.
सरला ठकराल यांनी वयाच्या २२ व्या वर्षी विमानाची उड्डाण भरत इतिहास रचला. १९३६ मध्ये सरला ठकराल एअरक्राफ्ट उड्डाण भरणारी पहिली महिला पायलट होत्या. त्यांनी चक्क साडी नेसून उड्डाण केले होते.
सरला ठकराल यांनी १९२९ मध्ये दिल्लीत असलेल्या फ्लाइंग क्लबमध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि येथेच त्यांची भेट पी डी शर्मा यांच्याशी झाली होती. त्यांसोबत विवाह केल्यानंतर त्यांनी पत्नीला व्यावसायिक विमान चालक होण्यासाठी प्रोत्साहित केले. पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे सरला ठकराल जोधपुर फ्लाइंग क्लब येथे ट्रेनिंग घेत होत्या.
१९३६ मध्ये लाहोर येथील विमानतळ त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होता जेव्हा २२ वर्षीय सरला ठकराल यांनी जिप्सी मॉथ नावाच्या दोन सीटर विमान उडवले.
परंतु १९३९ त्यांच्या साठी वाईट राहिले. कमर्शियल पायलट लाइसेंस घेण्यासाठी कठोर मेहनत करत असताना दुसरं विश्व युद्ध सुरू झाले. फ्लाईट क्लब बंद पडलं आणि त्यांना आपली ट्रेनिंग मध्येच थांबवावी लागली.
याहून दुख:द म्हणजे त्याच वर्षी एका विमान अपघातात त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या लाहोराहून पुन्हा भारतात आल्या आणि मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये भरती झाल्या. तेथे त्यांनी पेंटिंगचे शिक्षण घेतले आणि फाइन आर्टमध्ये डिप्लोमादेखील केला.
भारताचे विभाजन झाल्यावर सरला आपल्या दोन्ही मुलींसोबत दिल्लीला परत आल्या आणि येथे त्यांना पी पी ठकराल भेटले. दोघांनी १९४८ मध्ये विवाह केले. नंतर त्या यशस्वी आणि उद्योजक पेंटर झाल्या. सरला ठकराल यांचे निधन १५ मार्च २००८ रोजी झाले.
आज गुगलने सरला ठुकराल यांच्या १०७ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने डूडल बनवले आहे. हे डूडल वृंदा झवेरी यांनी बनवले आहे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply