भारतात टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला १९६५ मध्येच, त्यामुळे काहींच्या मते तीच सुरवात मानली जाते. पण याची रंगत खरी वाढली ती १९८२ नंतर, जेव्हा टीव्ही खरोखर ‘रंगीत’दिसू लागला. तोपर्यंत ‘कश्मीर की कली’आणि ‘नवरंग’ हे चित्रपटसुद्धा ‘ब्लॅक अँड व्हाइट’मध्येच पाहावे लागले होते.
१९८२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !
१९७५ साली आलेल्या व्हेन कॉन्मिगो (Ven Conmigo) या मेक्सिकन दूरचित्रवाणी मालिकेच्या धर्तीवर हमलोग या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेची कल्पना तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वसंत साठे यांना १९८२ मध्ये मेक्सिकन दौऱ्याच्या वेळी मिळाली. भारतात आल्यावर मंत्री वसंत साठे यांनी याच्यावर काम करण्यास सुरुवात केली. व ‘हमलोग’ या मालिकेचे निर्मिती झाली.
‘हमलोग’ ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका होती. आणि भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा होता. अशोक कुमार द्वारा सूत्र संचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते. ७ जुलै १९८४ रोजी पह्लियांदा या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला होता. त्या वेळी अशोककुमार बोलत असत, ‘‘…लेकीन बसेसर था कहाँ और किस उलझन में?… मंझलीने माँ को क्याह बताया था? कल की सुबह अपने साथ क्याह लाने वाली है?… बेखबर तो मैंभी हूँ – पर बेआस नहीं… होता है क्या. कल देखेंगे, ‘हम लोग’!
या मालिकेत कलाकारांना ३०० ते ५०० पर्यंतचा मेहनताना मिळाला, जवळजवळ या मलिकेतील सर्व कलाकार थिएटरला जोडलेले होते. शुटींगला आपले स्वत:चे कपडे व जरुरीच्या वस्तू कलाकारांनी घरून आणलेल्या हो.
‘हमलोग’ मालिका ही एक कौटुंबिक ड्रामा होता. शिवाय प्रत्येक भागाच्या अखेरीला अशोककुमारांचं निरूपण हे तिचं खास वैशिष्ट्य होतं. ‘हमलोग’नं लोकांना मालिकांची चटक लावायला सुरूवात केली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. ‘हमलोग’मधले दादाजी, दादीजी, बडकी, मंझली, छुटकी, लल्लू, नन्हे, प्रिन्स या पात्रांनी लोकांच्या मनात घर केलं. ही पात्रं जणू काही आपल्याच घरातली आहेत असं लोकांना वाटायला लागलं. या मालिकेच्या संगीताची बाजू अनिल विश्वास यांनी सांभाळली होती.
या मालीकेचे दिग्दर्शक पी. कुमार वासुदेव होते. ही मालिका सतरा महिने चालली या काळात अशोक कुमार यांना ४०००० हून अधिक प्रत आली होती. हो गोष्ट १९८५- ८६ सालची आहे. या वरून ही मालिका किती आवडली होती हे लक्षात येते.
यातील कलाकार होते.
अशोक कुमार, विनोद नागपाल, ज्योश्री अरोरा, राजेश पुरी, अभिनव चतुर्वेदी, के.एड.बडकी, दिव्य सेठ,लव्हलीन मिश्रा, लाहिरीसिंग, सुषमा सेठ, रेणुका इसरानी, कमिया मल्होत्रा ,आशिफ शेख, मनोज पाहवा, सुचित्रा (श्रीवास्तव) चितळे, कविता नागपाल, अश्विनी कुमार, राजेंद्र घुगे, अपर्णा कटारा, एस. एम. झहीर, विश्व मोहन बडोला.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply