नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अकरा

पोट म्हणजे जणु काही मिक्सरच !

भांडे अर्धे अन्नाने, पाव भाग पाण्याने, असे एकुण पाऊण भरावे. पाव भाग हवेच्या संचरणासाठी मोकळा ठेवावा. आणि झाकण लावावे आणि दीड दोन मिनीटात मिक्सरमध्ये सर्व अन्नाचे पीठ तयार होते, हे आपण बघतोच.
जसं मिक्सरमध्ये तस्संच अगदी पोटामधे सुरू असतं ! फक्त पोटामधे हा मिक्सर दीड दोन मिनिटाऐवजी दीड दोन घंटे सुरू असतो.

जेवायला सुरवात करावी. पोटाला सूचना मिळत जाते. तसे तसे पोटात पाचक स्राव वाढत जातात. ज्या पदार्थाला पचवायला जे घटक आवश्यक आहेत, ते आधी पासूनच तिथे स्वागताला तयार असतात. सहा चवींचे सहा सोहळे आतमधे सुरू होतात. प्रत्येक चव बाहेर वेगळी असली आणि नंतर आतमधे जरी, अवघा रंग एक झाला अशी अवस्था असली तरी, त्यामधे प्रत्येक पदार्थाला जे पचवायला हवंय, ते मिळत जाते. आणि प्रत्येक पदार्थ आपलं रूपांतर करून घेण्यासाठी तयार असतो.

नाटक सुरू करण्यापूर्वी कसं सगळे कलाकार ड्रेसिंग रूममधे नियमित कपड्यांमधे आत जातात. आतमधे रंगभूषाकार एकच असतो, त्याला प्रत्येक जण आपली भूमिका काय आहे ते सांगतो, त्याअनुसार तो सगळ्यांना असं काही रंगाने रंगवतो, त्यात त्याचं मूळ रूप बदलवूनच टाकतो, जेव्हा हे कलाकार रंगमंचावर येतात, तेव्हा स्वत्व विसरून देहभान हरवून त्या भूमिकेत तादात्म्य पावतात. आणि आपल्या वाटेला आलेला कलेचा भाग सादर करत असतात. प्रत्येक जण फक्त आपली भूमिका, आपली एन्ट्रीची वेळ, एक्झिटची वेळ, आपले संवाद लक्षात ठेवतो, कोणत्या वाक्यानंतर, त्या नाटकातली माझी एन्ट्री, माझा सहभाग दाखवायचा आहे हा क्रम लक्षात ठेवलेला असतो. आणि नाटकाचा पूर्ण एकत्रित परिणाम एकदम उठावदार होतो.

अगदी तस्संच या अन्नद्रव्यांच होत असावं.
तेल तूप इ. स्निग्ध पदार्थ पचवणारी यंत्रणा वेगळी, पिष्टमय पदार्थ, आंबटगोड तिखट पचवणारी यंत्रणा वेगळी. जरी वेगवेगळी असली तरी ही सर्व यंत्रणा त्या मोठ्ठ्या रंगभूषाकाराच्या आज्ञेत आपलं काम करत असतात. अगदी यंत्राप्रमाणे.

रंगवाल्यांकडे कसं आता आपल्याला हवी असलेली शेड तयार करण्यासाठी कंप्युटरवर एक निश्चित प्रोग्राम असतो, त्यात आपल्याला हव्या असलेल्या रंगाच्या शेडचा क्रमांक लिहिला की, आतमधे जे बेसिक रंग असतात, त्यातील कोणता रंग किती मिली सोडायचा हे आधी कंप्युटर द्वारे ठरवलेलं असतं, तो तेवढ्याच प्रमाणात सिक्रीट केला जातो.
पण आपल्यासाठी हे सिक्रेट असतं.
आपल्याला काय महत्वाचं?
आपल्याला जो रंग हवा आहे, त्याच शेडनुसार तो मिळणं. बरोबर ना ! त्या सिस्टीममधे बदल करण्याची सूत्र आपल्या हातात घेऊ नये.

आतमधे मिक्सर फिरत असतो, योग्य प्रमाणात वेगवेगळे रंग योग्य प्रमाणात एकत्र होत असतात. फक्त आपल्याला त्याची जाण नसते.

ऐनवेळी प्रोग्राम बदलवणं तर फारच कठीण असतं. म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत, ज्याची पूर्वकल्पना आतदिली गेली नसेल. म्हणजेच कोटेड फूड. बाहेरून एक चव आत मधे दुसरीच चव. जसं कॅपसुलमधे भरलेलं कडू औषधी. यासाठीच आयुर्वेदीय पद्धतीने जी औषधे दिली जातात, ती विशिष्ट चवींची असतात, त्याची चव तशीच्या तश्शी आतमधे समजणं तेवढंच महत्वाचं असतं. म्हणूनच आयुर्वेदातील चूर्ण, चाटण, उगाळून घ्यायची असतात. कोणत्याही औषधांच्या चवी समजणे खूप महत्वाचे असते. फसवून औषध तर नकोच, पण आहार पण ज्या त्या चवीचा समजून उमजून आत पाठवावा.

जीभेला फसवून केलेलं खाद्यकर्म नंतर त्रासदायक होऊ शकतं. हे लक्षात असावे.
आतमधे फसवाफसवी नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..