नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग बारा

एकदा मिक्सर सुरू झाला की झाकण मधेच उघडायचं नाही, मधेच झाकण उघडलं की आतील सर्व बाहेर उडते. तस्संच एकदा पचन सुरू झाले की आत टाकणे बंद करायचे. एकदा भोजनान्ते पिबेत तक्रम् झाले, तोंड धुतले, मुखवास खाल्ला की नंतर अधे मधे काही खायचे नाही की प्यायचे नाही.

पातेल्यात समजा भात करायला ठेवलाय, पाणी उकळायला सुरवात झालेली आहे, तांदुळ आत घातले आहेत, अर्धवट शिजलेले आहेत, आणि मधेच आणखी दोनतीन पाहुणे आले. त्याच्यासाठी वाढीव भात करायचा झाला तर, अर्धवट शिजत असलेल्या भातात परत तांदुळ टाकायचे का ?
असं केलं तर भात नीट होणार नाही. बिघडून जाईल.

पीठाच्या चक्कीमधे वरून धान्य घातले आहे. पीठ पडायला सुरवात झाली आहे, आणि अचानक लोड शेडींग सुरू झाले, चक्की बंद झाली.
तर काय होते ?
जे धान्य आतमधे होते ते जैसे थे अवस्थेत रहाते. पुनः जेव्हा लाईट येतील, तेव्हा परत चक्की सुरू होईल, पण धान्याचे काही कण, न भरडताच पुढे जातात आणि पीठ चाळून घ्यावे लागते.

तसेच पचन एकदा सुरू झाले, मिक्सर एकदा सुरू झाला की मधे थांबवणे नाही. कोणत्याही कारणाने मधेच आतला मिक्सर थांबला/ थांबवला की पचनावर परिणाम होतोच.

म्हणून आज्जी म्हणायची, अरे जेवताना मधेच उठू नये. भरल्या ताटावरून उठून जाऊ नये एकदा जेवायला सुरवात केली की, सर्व लक्ष जेवणातच हवे. मन जेवताना तिथेच हवे. नाहीतर आतमधे काय हवं नको, हे समजणार कसं ?

आज आपण जेवण कसे जेवत आहोत, याचा या निमित्ताने विचार व्हावा. आजच्या काळाचा विचार केला तरीसुद्धा जेवताना शांतपणे, पूर्ण लक्ष जेवणातच ठेवून, पूर्ण आनंद घेऊन जेवणे एवढे अशक्य कोटीतले आहे का ? टीव्हीवर मॅच नाहीतर मालिका मल्लिका पहात जेवणे, गप्पागोष्टी करत जेवणे, मोबाईल वर चॅट करत जेवणे, वाॅटसप पहाता पहाता जेवणे, जेवण अर्धवट टाकून उठणे, जेवताना अभ्यास करणे, जेवणानंतर स्वीट डिश, आईस्क्रीम खाणे, हे असे केल्याने पचन बिघडते.

स्टार्ट टू फिनिश जेवण एका स्ट्रोकमधेच झाले पाहिजे.
विदाऊट ब्रेक, विदाऊट जाहिराती कार्यक्रम पहायलादेखील आपल्याला किती आनंद मिळतो ना !

मग अस्सच जेवण, विदाऊट ब्रेक, विदाऊट कमर्शियल अॅड, झालं तर पचवणाऱ्याला किती आनंद होईल ना ?

पण नाही.
“मला जेवतानाचाच वेळ बोलायला मिळतो, जेवत असताना समजा अर्जंट काॅल आले तर काय करायचं ?” हे असे लंगडे समर्थन आपले आपण करून घेत असतो, आणि त्याचा आनंद, आपण हिरावून घेत असतो.

म्हणजे, पोट माझे आहे, मी काय हवे ते करेन, त्या पोटाने मी जे (अत्याचार ) करतो ते सहन केलेच पाहिजे, या मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे.

ही इंद्रिये हे अवयव, हे मन, त्याने या जन्मापुरते आपल्याला सांभाळायला दिलेले आहे. ते नीटच सांभाळले पाहिजे. त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ….

नाहीतर तो देईल त्या शिक्षा भोगायला तयार असले पाहिजे..
वुई आर ओन्ली अ केअर टेकर ऑफ थिस बाॅडी ! वुई हॅव टु……..

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..