नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग आठ

अन्नाला ओलेपणा क्लिन्नपणा येण्यासाठी महत्त्वाचे काम करते ती लाळ. डोळ्यात ज्याप्रमाणे पाणी स्रवत असते, तशी लाळ तोंडात स्रवत असते. लाळेच्या बुळबुळीतपणामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते, आतड्यांना अन्न घासले जात नाही.म्हणून हा ओलेपणा एक प्रकारे वंगणाचे काम करत असतो.

लाळेमधे टायलीन नावाचे हे एक प्रकारचे विकर म्हणजे एन्झाइम आहे. पचनाला मदत करणारी अन्य घटकद्रव्ये यात सामावलेली असतात. जेवढी लाळ जास्ती तेवढे पचन सुलभ. त्यामुळे प्रत्येक घास जेवढा अधिक वेळ चावला जाईल, तेवढीच जास्त लाळ तयार होते.

शाळेत चौथीमधे असताना एक प्रयोग केलेला आठवतोय, भाकरीचा तुकडा जेवढा चघळला जाईल, जेवढी लाळ मिसळली जाईल, तेवढी भाकरी गोड होत जाते. पिष्टमय पदार्थांचे पचन करण्यासाठी लाळ मदत करते, असे अनुमान प्रयोगवहीत लिहिलेले होते.

आज व्यवहारात मधुमेहाच्या अपथ्यामधे पिष्टमय पदार्थ सांगितले जातात. पिष्टमय पदार्थ पचले नाहीत तर मधुमेहासारखे आजार बळावतात, म्हणून मधुमेहामधे आपली लाळ हे आपले औषध ठरू शकते. घाईघाईने खाल्ल्यामुळे लाळ अन्नामधे चांगली मिसळली जात नाही. आणि पचन बिघडते.

लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींची तोंडे नीट उघडी असतील तर लाळेचे स्रवण चांगले होते. गव्हापासून बनलेल्या मैद्याच्या लगद्याने लाळेची काही छिद्रे बंद होतात. याकरीता मैद्यापासून बनलेले पदार्थ रोज रोज खाणे बंद करायला हवेत.

लाळ सुटण्यासाठी आंबट तिखट हे पदार्थ मदत करतात. चिंच म्हटली तरी तोंडात चिंच झरकन पाझरते. आवडीचे पदार्थ असतील तर तोंडाला पाणी सुटते. नारळाचा तुकडा, चार शेंगदाणे, दोन चिमूट बडिशेप, लवंग, वेलची, मसालापान यापैकी काहीही जेवणानंतर चघळल्यामुळे लाळ तयार होते आणि पचन सुधारते.
तंबाखू, गुटका, मावा सारखे सतत काहीतरी चघळत राहाणे चुकीचे. हे लक्षात ठेवावे.
नाहीतर आपण सोयीस्कर अर्थ काढण्यात पटाईत !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..