उद्योगपति कमलनयन बजाज यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ रोजी झाला.
जमनालाल बजाज यांचे ज्येष्ठ चिरंजीव कमलनयन बजाज यांनी फार कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. इंग्लंड येथील कॅम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले. त्यांनी वडिलांना व्यवसाय व समाजकार्यात सहकार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी शेवटपर्यंत तत्त्वांशी तडजोड केली नाही. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग ते सामाजिक कार्यासाठी खर्च करीत होते.
त्यांना महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला. ते देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना ते सर्वात आधी देशाचा विचार करीत होते.
कमलनयन बजाज यांच्या कार्यकाळात बजाज समूहाने देशातील पहिल्या १० सर्वश्रेष्ठ औद्योगिक घराण्यात स्थान मिळविले.
राहुल बजाज हे कमलनयन बजाज यांचे चिरंजीव. आज बजाज समूहाचे बाजारात १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे भांडवल आहे. ८ हजार कोटी रुपये निव्वळ नफा आहे.
बजाज ऑटो ही मोटरसायकल तयार करणारी जगातील तिसरी मोठी कंपनी आहे.
कमलनयन बजाज यांचे १ मे १९९२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply