नवीन लेखन...

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in women from the perspective of ayurveda

त्रिफळा म्हणजेच हरीतकी, आमलकी व बिभितकी ह्यांचे समप्रमाणात मिश्रण. ह्या आयुर्वेदोक्त रसायन द्रव्यामुळे रक्तातील T जातीच्या पांढऱ्या पेशी व NK पेशींमध्ये वाढ होऊन रोगप्रतिकारक्षमता सुधारते.

हरीतकी: जंतूसंसर्गा पासून बचाव करून शरीराची रोगप्रतिकारशक्ती सतत वाढवणारे हे एक श्रेष्ठ फळ आहे. पचन उत्तम ठेऊन शरीराला हलकेपणा देणे हा हरीतकीचा स्वभाव आहे. मेंदू, हृदय, यकृत, प्लीहा, प्रजनन संस्था, अस्थिसंधी, त्वचा, मूत्र विसर्जन संस्था किंवा शरीरातील इतर कोणतीही यंत्रणा असो, हरीतकी त्यांची सर्वतोपरी काळजी घेते.

बिभीतक: विविध विषारी रसायनांमुळे किंवा आहारातील रासायनिक रंग, अन्नसंरक्षक घटक इ. च्या सेवनाने यकृत विकार होतात व गर्भाधारणेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. बिभीतकाने यकृताचे कार्य उत्तम राखले जाते व गर्भनिरोधक अडथळे दूर केले जातात. ह्याशिवाय ह्यातील पेशीरक्षक गुण गर्भस्थापनेस सहाय्य करतात.

आमलकी: ही वनस्पती सप्तधातु पोषक, म्हणजेच शरीर वाढीच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक असलेल्या पोषणाची सर्वांगीण क्षमता धारण करते. ह्यातील अस्कोर्बिक अम्ल वंध्यत्व नाहीसे करण्यात कमालीचे उपयुक्त आहे. पौगंडावस्थेत होणारे बदल, प्रजनन यंत्रणेला बळ देणे, अन्तःस्रावी ग्रंथींचा समतोल साधून गर्भस्थापनेस योग्य वातावरण तयार करणे अशा विविध गुणांनी समृद्ध आहे.

वेखंड: वेखंडात उत्तम पेशिरक्षक गुण आहेत. त्यातील प्रोअॅन्थोसायनिडीन्स मुळे प्रजनन संस्थेच्या यंत्रणेवर विशेष कार्य होते व त्याला बळ प्राप्त होउन कार्य सुधारते. वेखंडाने रोगप्रतिकारक्षमताही वाढते.

हरिद्रा: काही रासायनिक औषधांमुळे जननक्षमता नाश पावते. त्या औषधांपासून निर्माण होणारे घातक परमाणु संपूर्ण प्रजनन संस्थेवर आघात करून वंध्यत्व निर्माण करतात. हळदीच्या सेवनाने ही क्षमता पूर्ववत होऊ शकते. हळदीच्या आभ्यंतर प्रयोगाने रेडिएशनचे दुष्परिणाम हटतात. त्याचबरोबर SOD-1 आणि PRDX-1 मध्ये बदल होऊन रोगप्रतिकारक्षमता वृद्धिंगत होते.

दारुहळद: ज्वरहर, जंतुसंसर्ग नाशक, यकृत शोधक, प्रमेह नाशक, कर्करोग निवारक, पेशीरक्षक, रक्तातील चरबी नियंत्रक अशा गुणांनी दारुहळद परिपूर्ण आहे. ह्यातील बर्बेरिन नामक रसायन मेंदूतील सिरोटोनिन व डोपामाईन्स चे संतुलन साधून मानसिक ताणतणाव नियंत्रण करण्यात उपयोगी आहे.

यष्टिमधु: रेडिएशनमुळे संभवणारे बीजदोष, होणारा अंतस्त्वचा शोथ (म्युकोसायटिस), कष्टार्तव अशा स्थितीत लाभ होतो. ह्याचे उत्तम पेशीरक्षक म्हणून पण कार्य अवगत आहे.

सारिवा: इम्युनोग्लोब्युलिन्स चे स्राव वर्धन व अडिनोसिन डिअमायनेझचे कार्य सुधार अशा दोन प्रकारे कार्य करून रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यासाठी सारिवा उपयुक्त आहे. विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम व डी एन ए वरील आघात ह्यांचे सारिवा मुळे संरक्षण होते.

कुटकी: यकृतरोग निवारणात अग्रगण्य स्थानावर असलेली अशी ही कुटकी. त्यातील पिक्रोलिव्ह नावाचा घटक रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यात फारच उपयोगी आहे. कुटकी सेवनाने मॅक्रोफेज मायग्रेशन इंडेक्स (MMI) मध्ये वाढ होते, यकृताचे कार्य उत्तम राहते, सार्वदेहिक प्रतिकारशक्तीमध्ये कैक पटीने वाढ होते.

विदारीकंद: विदारीकंदामुळे गर्भाशय, बीजकोष, गर्भाशय ग्रीवा आणि योनिमार्गातील ग्लायकोजेन चे संहनन सुधारते. ह्याशिवाय विदारीकंदामध्ये श्रेष्ठ पेशीरक्षक व रोगप्रतिकार क्षमता वर्धक गुण आहेतच.

हिंगु: स्त्रियांच्या वंध्यत्वावर, अकाली होणाऱ्या गर्भस्रावावर, कष्टार्तव, श्वेतप्रदर, रक्तप्रदर अशा मासिक स्रावाच्या अनेक समस्यांवर हिंगाचा उपयोग होतो. ह्याने प्रोजेस्टेरॉनच्या स्रावात वाढ होते.

शतावरी: स्त्री वंध्यत्वावर उत्तम कार्य करणारी ही वनस्पती आहे. शतावरीने शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा जागृत होते, प्रजनन यंत्रणेमधील सूज हटते, योनिमार्गातील ओलावा वाढतो, कोषातील बिजांची परिपक्वता वेळेवर होते, गर्भधारणेसाठी गर्भाशयाची स्थिती सुधारते, गर्भस्राव व गर्भपात होण्यापासून प्रतिबंध होतो, गर्भाची केंद्रीय मज्जा यंत्रणा व सुषुम्ना ह्यांचे कवच सांधण्याची क्षमता असलेले फोलिक अम्ल शतावरीमध्ये प्रचुर प्रमाणात आहे. अन्तःस्रावी ग्रंथींचे संतुलन राखून स्तन्यवाढीचे कार्य सुधारते. हिच्या सेवनाने पेश्यांतर्गत मायटोकॉनड्रिया वर कार्य होऊन रेडिएशनचा यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. त्यामुळे गर्भस्थापना व पोषणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याची क्षमता ह्या एका वनस्पतीमध्ये आहे. संपूर्ण गर्भावस्थेत जरी शतावरी सेवन केली तरी यत्किंचितही अपाय नाही उलट अनेक फायदेच होतात इतकी ती गुणकारी आहे. शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए , बी १, बी २, सी, ई तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न व फोलिक अम्ल आहे.

अश्वगंधा: अश्वगंधाने गोनाडोट्रोपिन हॉर्मोन्स चे स्राव वाढून बीज परिपक्वतेस चालना मिळते व त्यामुळे वंध्यत्वावर मात करण्यात यश प्राप्त होते. अश्वगंधा सर्वश्रेष्ठ पौष्टिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धकही आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वृद्धी होते.

“फलमाह” च्या प्रत्येक विलेपित गोळीतील घटक व प्रमाण:
मंजिष्ठा (Rubia cordifolia), अक्कलकारा (Anacyclus pyrethrum), तगर (Valeriana wallichii), त्रिफला, शर्करा, वचा (Acorus calamus), हरिद्रा (Curcuma longa), दारुहरिद्रा (Berberis aristata), यष्टिमधु (Glycyrrhiza glabra), सारिवा (Hemidesmus indicus), अजमोदा (Apium graveolens), कटुका (Picrorrhiza kurroa), विदारीकंद (Pueraria tuberosa), हिंगु (Ferula narthex), अश्वगंधा (Withania somnifera) प्रत्येकी ३० मिलीग्रॅम; शतावरी (Asparagus racemosus) 60 mg; भावना द्रव्य – शतावरी (Asparagus racemosus) आवश्यकतेनुसार
सेवन विधी: (गर्भधारणा निश्चिती पर्यंत) २ – २ गोळ्या रोज दोन वेळा, घोटभर दुधाबरोबर, जेवणानंतर
गर्भधारणा निश्चिती नंतर प्रसूती पर्यंत: १ – १ गोळी रोज दोन वेळा, घोटभर दुधाबरोबर जेवणानंतर

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..