इन्सुलिन रेजिस्टन्स ही एक शारीरिक अवस्था असून ज्यात शरीरातील पेशी इन्सुलिन तयार करतात पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यास त्या अयशस्वी ठरतात. ह्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनसाठी प्रतिरोधक (रेजिस्टन्स) बनतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी व शरीरातील किटोन बॉडिजचे प्रमाण वाढू न देण्यासाठी २०० किवा त्यापेक्षा जास्त इन्सुलिनची मात्रा आवश्यक असते अशीही इन्सुलिन रेजिस्टन्स ची व्याख्या करतात.
इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये आवश्यक तपासण्या – फ़ास्टींग शुगर (उपाशी पोटीची साखर), फ़ास्टींग इन्सुलिन (उपाशी पोटीचे इन्सुलिन), सी रिअॅक्टीव प्रोटिन (सिरपी), लिपिड प्रोफाईल (रक्तातील चरबी), पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पिसिओस) असलेल्या स्त्रियांनी इन्सुलिन टॉलरन्स टेस्ट आणि क्वानटिटेटिव्ह इन्सुलिन सेन्सिटिव चेक इंडेक्स (QUICKI) – हे एक गणिती सूत्र असून ह्यात रक्तातील साखर व इन्सुलिन ह्यांचा तपासण्यांचा वापर करण्यात येतो.
ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो अश्या व्यक्तींमध्ये साखर ही शरीरातील पेशींमध्ये शोषण्याऐवजी रक्तातच मिसळलेली राहते. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखर पेशींमध्ये शोषण्यासाठी शरीरातील पॅनक्रीयाज मधील बीटा सेल (पेशी) जास्त इन्सुलिनची निर्मिती करतात. जो पर्यंत ह्या पेशी जास्त इन्सुलिनची निर्मिती करू शकतात तोपर्यंत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात ह्या पेशी यशस्वी ठरतात पण कालांतराने ह्या पेशी योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाहीत. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढलेले रहाते. इन्सुलिनची अयोग्य निर्मिती आणि वाढलेली साखर ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणुन आपणास मधुमेह (डायबेटिस), प्रिडायबेटिस तसेच शरीराला जास्त अपाय करणारे रोग होण्याची शक्यता बळावते. प्रयोग असे दाखवतात कि टाइप २ डयबेटिस होण्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा एक महत्वाचा घटक आहे. असे असूनही मधुमेह होईपर्यंत बऱ्याच जणांमध्ये ह्या अवस्थेची तपासणी केलेली आढळत नाही.
ब्रेन (मेंदू) फोगीनेस – एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे, रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण, पोट फुगणे, सुस्ती येणे अणि मुख्यत्वे जेवल्या जेवल्या सुस्ती येणे, भूक जास्त लागणे, वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, रक्तदाब वाढणे, ट्रयग्लिसरेइड नावाची रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, प्रो एन्फ़्लमेटरि सायटोकायनेज नेराश्या किवा खिन्नता विषःणता जाणवणे (डिप्रेशन), अकांथोसीस निग्रीकंस (AN) – जसे कि मानेवरची अक्झीला (बखोट) येथील त्वचा काळसर व जाडी दिसणे, त्यावर दोरी सारखे वळ दिसणे, यकृतामध्ये चरबी जमा होणे, स्त्रियांमध्ये प्रजनन दोष निर्माण होणे, मुलांमध्ये वाढ योग्य प्रमाणात न होणे ह्या सारखी लक्क्षणे इन्सुलिन रेजिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येतात.
इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यासाठी विविध करणे आहेत पण अनुवंशिकता हे एक सबळ कारण ठरू शकते. प्रयोगाअंती अति कॅलरीजचे सेवन आणि शारीरिक हालचालीची कमतरता ह्यांचा जवळचा संबंध आहे असे सिद्ध झाले आहे. शारीरिक हालचालीची कमतरता, एखादे इन्फेक्शन (रोगाची लागण) किवा एखादा गंभीर आजार, मेटबोलिक सिंड्रोम, वाढलेले वजन मुख्यत्वे पोटाचा घेर वाढणे, गर्भावस्था, काही औषधांचे सेवन उदाहरणार्थ स्टिरोइड तसेच तणाव ह्या सगळ्यांमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याची शक्यता बळावते. लेप्टिन रेजिस्टन्स असल्यास जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची चटक लागते व ती वाढतही जाते.
अति कॅलरीज, अति फॅट, मुखत्वे सॅचुरेटेड फॅटचे सेवन, मिठाचे अतिसेवन तसेच फास्ट फूडचे अतिसेवन आणि जास्त प्रमाणात नॉन-व्हेजचे सेवन अशा काही चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे शरीरात चरबीच्या पेशीत वाढ होते आणि त्यामुळे वजन वाढण्याचा वेग वाढतो. वाढलेल्या वजनामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सच्या प्रमाणात वाढ होते.
न्युट्रिशनल मोडुल्येशन ओफ इन्सुलिन रेजिस्टन्स ह्या विषयावर पुनर अवलोकानातील लेखात असे आढळले आहे कि पोटाच्या भागातील जमा झालेली चरबी हे इन्सुलिन रेजिस्टन्स व डायबेटीस साठी महत्वाचे कारण ठरू शकते आणि वजन घटल्यास आणि त्यातूनही पोटाच्या भागातील चरबी घटवल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यास व उलटवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.
इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यात व बरा करण्यात जीवनशैली महत्वाची कामगिरी करते त्यामुळे जर आपणास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळावयाचा असेल तर किवा तुम्ही जर ह्या व्याधीने ग्रस्त असाल आणि ती तुम्हाला आटोक्यात आणावयाची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. वाढलेले वजन कमी करणे, शरीरिक हालचालीत वाढ करणे जरुरीचे आहे.
अन्नातील तंतुमय पदार्थ भूक कमी करण्यास मदत करतात आणि भूक मंदावण्यास मदत झाल्यामुळे आपला आहार (कॅलरीजचे सेवन) कमी होते. ह्यामुळे वजन घटायलाही मदत होते. रक्तातील साखर व रक्तातील चरबी घटवण्यासही मदत करतात. तळकट पदार्थ, गोड पदार्थ, खारट पदार्थ, फास्ट फूड, मीठ, साखर ह्यांचे सेवन केल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळण्यास किवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल
आहारात कोणता व कसा बदल करायचा हे तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्सच्या करणावर तसेच तुमच्या सर्व चाचण्यांवर अवलंबून असेल.
डॉ. शीतल म्हामुणकर
आहारातज्ज्ञ
Leave a Reply