स्पर्धात्मक परिक्षांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणार्या मुलाखत फेरीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची काही अप्रतिम आणि डोकेबाज उत्तरे
प्रश्न : जर १० माणसे ८ तासात एखादी भिंत बांधतात, तर ४ माणसे ती भिंत बांधायला किती वेळ घेतील?
उत्तर : काहीच वेळ लागणार नाही. कारण ती भिंत ८ माणसांनी आधीच बांधलेली आहे.
प्रश्न : जर तुमच्या एका हातात ३ संत्री आणि ४ सफरचंद आहेत. आणि तुमच्या दुसर्या हातात ४ संत्री आणि ३ सफरचंद आहेत. तर तुमच्याकडे काय आहे?
उत्तर : तर माझ्याकडे खूप मोठे हात आहेत.
प्रश्न : एखादा माणूस ८ दिवस झोपेशिवाय कसा राहू शकतो?(done)
उत्तर : यात विशेष काहीच नाही. कारण तो रात्री झोपतो.
प्रश्न : जर तुम्ही निळ्याशार समुद्रात लाल रंगाचा दगड फेकलात तर काय होईल?
उत्तर : हे तर खूपच सोप्पं आहे. तो दगड ओला होईल किंवा पाण्यात बुडून जाईल.
प्रश्न : कोणती वस्तू अर्ध्या कापलेल्या सफरचंदासारखी दिसते?
उत्तर : त्याच सफरचंदाचा अर्धा भाग.
प्रश्न : ब्रेकफास्टला तुम्ही एखादी गोष्ट कधीच खाणार नाही, ती काय असेल?
उत्तर : डिनर
Leave a Reply