MENU
नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय ॲ‍ॅनिमेशन दिन

आपल्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी माणसाने करमणुकीचे अनेक पर्याय निवडले. मुलांवर थेट संस्कार करण्यापेक्षा गोष्टींच्या व चित्रांच्या माध्यमातून त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाता येतं, हे लक्षात आल्यावर कार्टून हे त्याचं सुरेख मिश्रण म्हणून नावारूपाला आलं. संगणकाच्या वापराने या ॲ‍निमेशनचं हे जग अधिकच विस्तारलं, लोभस झालं. अनेकांना या उद्योगाने आकर्षित करून घेतलं. आज टीव्ही, चित्रपट, जाहिराती ही सगळी माध्यमं ॲ‍ॅूनिमेशनने व्यापून टाकली आहेत.

‘ॲ‍निमेशन’ हा इंग्रजी शब्द ज्या मूळ लॅटिन शब्दावरून आला. त्याचा अर्थ आहे निर्जिव चित्रं सजीव करणं. वाचून आश्चर्य वाटेल की, ॲ‍निमेशनची कला ही अलीकडच्या काळातील नाही तर ती फार प्राचीन आहे. आदीम जमातींनी काढलेली गुहेतली चित्रं ही याच तंत्राचाच एक आविष्कार असल्याचं म्हटलं जातं. गुहांमध्ये काढलेल्या चित्रांतून या आद्य ॲ‍निमेटर्सनी प्राण्यांच्या हालचालीच रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचं आढळलं आहे.

२८ ऑक्टो्बर १८९२ या दिवशी पॅरिसमध्ये ग्रेव्हीन म्युझियममध्ये चार्ल्स इमाईल रेनॉड्‌स यांच्या, जगातल्या पहिल्याच, ॲ‍निमेशनपटाचे ऐतिहासिक प्रदर्शन झाले होते. द असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म्स द ॲ‍निमेशन’ म्हणजेच ‘असिफा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने २८ ऑक्टोॅबर हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय ॲ‍निमेशन दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्त जगभर विविध उपक्रम आयोजित केले जातात.

भारतात ॲ‍निमेशन उद्योगाची सुरुवात १९५६ साली झाली. त्यावेळी भारत आणि अमेरिका दरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत वॉल्ट डिस्ने स्टुडीओचे क्लेळअर विक्सि यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हीजन्सचे कार्टून फिल्म युनिट सुरु झाले. सामाजिक संदेश देण्याकरिता ॲ‍निमेशन कलेचा वापर फिल्म्स डिव्हीजन्सने मोठ्या प्रमाणात केला. भारतातील ॲ‍निमेशन उद्योगाचे प्रवर्तक राम मोहन यांना सन २०१४ मध्ये प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील विख्यात कार्टून स्टुडिओ वॉल्ट डिस्ने यांचे मोठे योगदान लाभल्याने हा उद्योग जगभर लोकप्रिय झाला. त्याव्यतिरिक्त जॉर्ज लुकास, जॉन लिसेस्टर, स्टीव जॉब्ज, स्टीव्हन स्पीलबर्ग यासारख्या प्रज्ञावान आणि प्रतिभावान दिग्गजांनी विविध प्रयोगाअंती पडद्यावर आभासी जग निर्माण केलं. ॲ‍निमेशन तंत्र हाच त्यांचा प्रयोगाचा आत्मा होता. मूळ कल्पनाचित्रं रेखाटल्यावर, सिनेमा माध्यमातून पडद्यावर दृकश्राव्य परिणाम साधणे, हे काम भारतातही अनेक वर्षे केलं गेलं आहे. भारतीय उद्योगांनी आपापले ॲ‍निमेशन स्टुडिओ उभारले. अमेरिका व इतर प्रगत देशांमधून भारतात कामांचा ओघ वाहू लागला. चिकाटी व कल्पकता यांच्या जोरावर भारतीय ॲ‍निमेटर्सनी अनेक मोठमोठया मालिकांचं व चित्रपटांचं ॲ‍निमेशन केलं. खासगी वाहिन्यांपाठोपाठ भारतात आलेल्या लहान मुलांच्या वाहिन्यांनी या क्षेत्रातली स्पर्धा वाढवली. केवळ परदेशी ॲ‍निमेशन फिल्म दाखवण्याऐवजी भारतीय संकल्पना असलेल्या कथा व पात्रं असलेल्या फिल्म खासगी वाहिन्यांनी दाखवायला सुरुवात केल्यावर त्यांनाही लोकप्रियता मिळाली.

इराकमध्ये सापडलेल्या पाच हजार वर्षापूर्वीच्या एका भांडयावर बकरीची ओळीनं काढलेली पाच चित्रं आढळली, त्यावरून जर वेगानं नजर फिरवली तर बकरी चालतेय असा भास होतो. ॲ‍निमेशन तंत्रातल्या जाणकारांच्या मते, हा ॲ‍निमेशनचा पहिला ज्ञात पुरावा असू शकतो. ॲ‍निमेशनच्या तंत्राचा पहिला प्रयोग अमेरिकेत झाल्याचं जरी सांगितलं जात असलं तरी तसेच अनेक प्रयोग चीन, फ्रान्स या देशांमध्येही झाल्याची माहिती आहे.

‘फ्लॅप बुक’ या तंत्राचा वापर अनेक देशांमध्ये करण्यात आला. ‘फ्लॅप बुक’ म्हणजे अनेक चित्रं असलेलं पुस्तक. जे झरकन फिरवल्यावर त्यातलं पात्र वा वस्तू हालचाल करत असल्याचा भास होतो. ‘फ्लॅप बुक’ तंत्र ॲ‍निमेशन उद्योगाचा पाया म्हणायला हरकत नाही. नंतर रेखाचित्रांचा वापर करून अनेक चित्रांच्या संचाच्या सहाय्याने ॲ‍निमेशन करण्याचं तंत्र माणसानं विकसित केलं. ॲ‍निमेशनचा हा प्राथमिक टप्प्यातील अवतार होता. यानंतर सिनेमाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणा-या कॅमे-याचा उपयोग ॲ‍निमेशनच्या चित्रफितींसाठी होऊ लागला. या सिनेमॅटोग्राफी तंत्रानं ॲ‍ॅणनिमेशनच्या जगतात क्रांती आणली. त्या काळात थिएटरात मुख्य चित्रपटांबरोबर असे ॲ‍निमेटेड चित्रपट दाखवण्यात येत. तेव्हा ॲ‍निमेशनचा हा प्रकार ‘कार्टुन फिल्म’ या नावाने ओळखला जाई.

तंत्रज्ञानाची प्रगती होऊ लागली तसे ॲ‍निमेशनच्या क्षेत्रात अनेक बदल झाले. संगणकाच्या वापराने या क्षेत्रात आणखी एक क्रांती घडवली आहे. सुरुवातीला ॲ‍निमेशनपटासाठी लाखो चित्रं हाताने काढावी लागत असत. आता हे काम संगणक करतो. अर्थात, आजही संगणकामध्ये हाताने काढलेली चित्रं अपलोड करावी लागतात. त्यानंतर संगणकातल्या आयुधांचा वापर करून हे ॲ‍निमेशनपट साकारले जातात. भारताने गेल्या काही वर्षात ॲ‍निमेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली. आपल्या निर्मात्यांची व ॲ‍निमेटर्सची स्पर्धा थेट आंतरराष्ट्रीय ॲ‍निमेटर्सशी आहे. मनोरंजनाचं माध्यम असलेलं हे क्षेत्र उद्योग व रोजगारनिर्मितीतही भरीव योगदान देतंय.

मूळात कोणत्याही ॲ‍निमेशनमध्ये चित्रभाषाच मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळे जगातल्या कुठल्याही प्रेक्षकांशी सहज संवाद साधला जात असतो. चित्रभाषा हीच ॲ‍निमेशनची सर्वात मोठी ताकद असून भाषा, प्रांत, वय याची बंधनं ॲ‍निमेशनला नाहीत. सिनेमातली दृष्टीसातत्यता ही साधारण एका सेकंदाला 24 चौकटी भर्रकन डोळ्यासमोरून गेल्या की पडद्यावर हालचालस्वरूप आभास अनुभवायला मिळतो. ॲ‍निमेशन तंत्रातही एका सेकंदाला 24 चौकटी चित्रित केल्या की, दृष्यपरिणामता साधली जाते. त्यातून कॅमेरा तंत्रातून एखाद्या दृष्याकडे पाहताना लेअर्सचा विचार ॲ‍निमेशनमध्ये होतो. त्यामुळे ॲ‍निमेशन फिल्म बनवितांना भरपूर कारागिरी उपयोगात आणावी लागते. काही सेकंदाच्या जाहिराती असोत, लघुपट अथवा पूर्ण लांबीचा चित्रपट असो, यात भरपूर मानवीय हाताला कामच काम असतं.

ॲ‍निमेशन तंत्राचा वापर अनेक चित्रपटांमध्येही करण्यात आला. ॲ‍निमेशनपट म्हणजे स्पेशल इफेक्ट्स नव्हेत. खास ॲ‍निमेटेड चित्रपटांची आपल्याकडे निर्मिती झाली खरी, मात्र तिकिट खिडकीवर त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. गेल्याच आठवडयात प्रदर्शित झालेल्या ‘छोटा भीम’ या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर खणखणीत यश मिळवलं. या यशामुळे भारतीय ॲ‍निमेशन क्षेत्राला नवा हुरूप येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘बाहुबली’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाने ॲ‍निमेशन तंत्रज्ञानाचाच एक भाग असलेले व्हीज्युअल इफेक्ट्स चे अनेक पैलू भारतीय प्रेक्षकांसमोर नव्याने आले आहेत. कथेतील अदभूतता, लार्जर दॅन लाईफ दृश्यीपरिणाम, ऐतिहासिक अथवा अमूर्त विषयाची पात्ररचना, पोषाख, दागदागिने, भव्य वास्तूरचना, कथेतला कालानुरुप भाव, आकर्षक दृष्यशैली, दिग्दर्शकीय चुणूक, आधुनिक तंत्रज्ञान व असे अनेक निर्मितीक्षम मूल्यं असलेले चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचू लागले आहेत. ॲ‍निमेशन म्हटलं की कार्टून फिल्म्स, व्हिडीओ गेम्स, व्हीएफक्सच, मनोरंजन, प्रबोधन, माहिती-तंत्रज्ञान, इंडस्ट्रिअल, मेडिकल क्षेत्रांशी संबंधित डॉक्यू्मेंटरी आणि कम्युनिकेशन फिल्म्स बनविणारी कला डोळ्यासमोर येते.

भारतात बाहेरून येणा-या ॲ‍निमेशनच्या कामांची संख्या आता कमी होत चालली आहे. आपल्या देशातल्या ॲ‍निमेशन स्टुडिओंना इतर लहान देशातल्या ॲ‍निमेशन स्टुडिओंकडून स्पर्धा करावी लागतेय. आज भारतीय बाजारासाठी तयार करण्यात आलेल्या खास भारतीय चित्रपटांची गरज निर्माण झालीय. हे नवं आव्हान आता हे ॲ‍निमेशन तंत्र स्वीकारू शकतं का, हाच खरा प्रश्न आहे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..