पोर्तुगीज कलर असोसिएशनने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय रंग दिन प्रस्तावित केला होता. २१ मार्च ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जातो व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. आजचा दिवस व रात्र समान असतो. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र आहे.
आंतरराष्ट्रीय रंग दिनानिमित्त रंग आपल्या आयुष्यात काय परिणाम करतात आपल्यावर याची माहिती.
पिवळा रंग – हा संपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असणं हे गुण दर्शवितो. आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. हा रंग ज्यांना आवडतो त्यांची बुध्दी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती सुध्दा तीक्ष्ण असते. ते वैयक्तिरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. जे अजून प्राप्त झाल नाही, त्याची प्रतीक्षा करण्याची संयमीवृत्ती ह्या रंगाने लाभते.
निळा रंग – हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे ह्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. ह्या रंगात सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली ह्यांची अनुभूती मिळते ( हा रंग स्वयपाक घर / किचन मध्ये वापरणे टाळावे ) हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. आपण बरं की आणि आपले घरदार बरे असा ह्यांचा स्वभाव असतो. वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो.
लाल रंग – हा सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग आणि उत्साह ह्याचे दर्शन ह्या रंगाद्वारे होते. विशेष करुन लग्न सभारंभामध्ये वधू-वराचे जोडेसुध्दा लाल रंगाचे वापरायची परंपरा काही समाजसमूहात आढळून येते, हेही कामोत्तेजकतेचेच निर्देशक असते. ह्या रंगातच मुळी एक प्रकारची ऊब असते, रक्तदाब, सर्दि, खोकला ह्या विकारांसाठी हा रंग उपयोगी सिद्ध झाला आहे.
हिरवा रंग- एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. त्याचप्रमांणे प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. म्हणून सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.
पांढरा रंग – वैशिष्ट्य हे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा पिवळा, नारगी, लाल, जांभळा ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply