संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. खरे तर १९७२ सालापासून युनोने आदिवासींच्या प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली. आदिवासींच्या संदर्भात वाढत्या संघर्षामुळे १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पुढे १८ डिसेंबर १९९० च्या युनोच्या आमसभेत १९९३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले आणि हे वर्ष १० डिसेंबर १९९२ च्या मानवाधिकार दिवसापासून सुरू झाले. या वर्षाच्या दरम्यान आदिवासींचे विविध प्रश्न जगासमोर मांडण्यात आले.
भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply