११ ऑक्टोबर हा जागतिक बालिका कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. ११ ऑक्टोबर २०१२ ला पहिला जागतिक बालिका कन्या दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून जगामध्ये मुलींच्या विकासासाठी तसेच जगातील काही ठिकाणी होणाऱ्या स्त्री-भ्रृण हत्या रोखण्यासाठी हा दिवस साजरा केला जावू लागला. हा दिवस संयुक्त राष्ट्र द्वारा घोषित करण्यात आला आहे.
देशामध्ये स्त्री-भ्रृण हत्या ही समस्या रोखण्यासाठी तसेच मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क मिळायला हवे यासाठी हा दिवस आज साजरा केला जातो. या कार्यक्रमामुळे देशात १०४ जिल्ह्यांमध्ये स्त्री-भ्रृण हत्या करण्याचा दर कमी झाला आहे.
आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. त्यामुळे काही सामाजिक समस्येमुळे मुलींना पुढे जाता येत नाही. म्हणून समाज जागृती व्हावी यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply