आज दिनांक १३ ऑगस्ट. परदेशात हा दिवस खास डावऱ्या म्हणजे डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठी साजरा केला जातो. ह्या दिवसाला ‘इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे’ म्हणून संबोधलं जातं. काय विशेष असतं लेफ्टी लोकांमध्ये? पूर्ण जगात ह्यांची संख्या किती आहे? डावरी प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण? ह्या संदर्भात आपण ह्या लेखात माहिती घेऊ.
वास्तविक पाहता , आपल्या बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की , डाव्या हाताने लिखाण करणारी व्यक्ती ही डावरी / लेफ्टी असते. खरंतर ते तसं नसून जी व्यक्ती सगळ्या कामांमध्ये आपल्या उजव्या हाताचा वापर न करता , डाव्या हाताचा वापर जास्त करते ती व्यक्ती डावखुरी असते. बरेच लेफ्टी लोक लिहिताना आपल्या उजव्या हाताचाच वापर करतात.
असं म्हटलं जातं की, लेफ्टी लोक फार हुशार , सर्जनशील आणि जास्त सक्रिय असतात. ते गणितं सोडविण्यात , कुठल्याही एका खेळात , कलेत हुशार असतात. लेफ्टी लोकांचा उजवा मेंदू जास्त सक्रिय असल्याने ते हुशार असतात , पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा ह्या गोष्टी तपासल्या गेल्या तेव्हा ह्याचा संपूर्ण स्पष्ट अहवाल प्राप्त होऊ शकला नाही. त्यामुळे ह्या विधानावर अजूनही वाद सुरू आहे आणि उत्तरावर प्रश्नचिन्हही.
ह्या लोकांची संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या ८ ते १०% च लोकसंख्या आहे.
आता आपण ह्यांची काही प्रसिध्द उदाहरणं पाहू
अभिनेते –
१) अमिताभ बच्चन
२) रजनीकांत
३) अभिषेक बच्चन
कलाकार –
१) लिओनार्डो दी विंची
खेळाडू –
१) मेरी कॉम
राजकीय व्यक्तिमत्व –
१) नरेंद्र मोदी
२) बराक ओबामा
शास्त्रज्ञ –
१) अल्बर्ट आईस्टन
उद्योगपती –
१) रतन टाटा
गायिका –
१) आशा भोसले
सरतेशेवटी पुन्हा एकदा , डाव्या हाताने सगळी कामं करणाऱ्या व्यक्तीच डावखुऱ्या असतात.
आपल्यात जे कोणी डावखुरे असतील त्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– आदित्य दि. संभूस
#International Left Handers Day
#13th August
Leave a Reply