आज ‘सेल्फी’ हा शब्द जर एखाद्याला ठाऊक नसेल तरच नवल. त्यामुळे ‘सेल्फी’ माहीत नाही, असं जर कुणी चुकून चारचौघांत म्हटलं तर मंद, बावळट, मुर्ख, कुठून आलायस रे, कुठल्या जगात राहतोस, गाव कोणतं रे तुझं? अशा प्रतिक्रिया त्याच्या वाटयाला येऊ शकतात किंवा हा माणूस किती क्षुद्र आहे अशी एक करडी नजरदेखील त्या व्यक्तीवर रोखली जाऊ शकते.
जगातली पहिली सेल्फी घेतला गेला होता तो १८३९ साली. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. स्मार्टफोनचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. उपलब्ध माहिती नुसार जगातील पहिली सेल्फी १८३९ घेतली गेला. फिलाडेल्फिया येथे एका दिव्यांच्या दुकानाबाहेर रॉबर्ट कॉर्नेलिअस यांनी ही सेल्फी घेतली होती.
मोबाईल मधील फ्रंट फेसिंग कॅमेरा येण्यापूर्वी अनेकांनी आरशासमोर उभं राहून फोटो घेतले आहेत. यात अशा पहिल्या मिरर फोटोची नोंद १९१४ सालची आहे. रशियाच्या झारची लहान कन्या ग्रँड डचेस अॅनास्टसिया निकोलिव्हना ऑफ रशिया यांनी आरशासमोर उभं राहून स्वतःचा फोटो घेतला होता. २००२ मध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका ऑनलाईन फोरमवर सेल्फी या शब्दाचा प्रथम वापर झाल्याची नोंद आहे.
नाथन होप या तरुणानं त्याच्या ओठांचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर त्यानं फोकसबद्दल माफ करा, ही सेल्फी होती असं लिहिलं होतं.
सेल्फी हा शब्द २०१३ मध्ये ऑक्सफोर्ड चर्चेचा भाग झाला. तसेच त्या वर्षी २०१३ या वर्षातला शब्द म्हणून (word of the year) नाव देण्यात आले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply