आंतरराष्ट्रीय पंच बिली बावडन यांचा जन्म ११ एप्रिल १९६३ रोजी झाला.
क्रिकेट पाहणाऱ्या एखाद्याला बिली बावडन हा अंपायर माहित नाही असे होणारच नाही. एखाद वेळेस मॅच मध्ये काय झाले हे लक्षात राहणार नाही पण बिली बावडनने केलेले मनोरंजनात्मक अंपायरिंग कोणीच विसरत नाही.
बिली यांचा जन्म हा न्यूझीलंडचा. लहानपणापासूनच त्याला खेळाचा नाद होता. वयाच्या विशीतच ते न्यूझीलंडच्या टीम मधून खेळू लागले. ते एक चांगला फास्ट बॉलर होता.पण पुढे त्याला एक आजार झाला अणि त्याला उमेदीच्या वर्षांतच क्रिकेटला रामराम ठोकावा लागला. पुढे तो अंपायर झाला पण इथे ही तो आजार त्याच्या आड येऊ पाहत होता ह्या वेळेस मात्र त्याने त्याच्या या दुखण्यावर तोडगा काढला. किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.
बिलीचे अनेक किस्से आहेत. त्याने एकदा एल. बी. डब्लू आउट देण्यास बराच वेळ घेतला पुढे जाऊन तो काहीतरी बघत होता, त्यानंतर परत माघारी आपल्या जागेवर येऊन त्याने आउट दिला. ग्लेन मॅकग्राने जेव्हा जाणीवपूर्वक डेड बोल टाकला तेव्हा बिलीने त्याला फारच नाट्यमय पणे रेड कार्ड दाखवले मैदानात खूपच हशा पिकला.
बिलीला बॉल तर अनेकदा लागलाय बॉलपण त्याचाच पाठलाग करत असतो. बिलीला बॉल स्वतःच्या दिशेने येताना दिसला तर तो गमतीशीर पणे तो चुकवतो आणि जर बसलाच तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेरा टीपतोच, इतके मिश्र आणि विनोदी भाव असतात त्याचे. आपल्या २० वर्षाच्या करियर मध्ये त्यांनी २०० वनडे व ८४ टेस्ट साठी पंच म्हणून काम केले आहे.
Leave a Reply