आंतरराष्ट्रीय पंच रोशन महानामा यांचा जन्म ३१ मे १९६६ रोजी झाला.
रोशन महानामा यांनी १९९७-९८ मध्ये कोलंबो येथे सनथ जयसूर्यासह दुसऱ्या विकेटसाठी ५७६ धावांची भागीदारी रचली. कसोटीत आजही हा विक्रम कायम आहे. दोन दिवस फलंदाजी करणारी ही पहिली जोडी ठरली. त्यांच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेने ६ बाद ९५२ धावा केल्या. हाही एक विक्रम ठरला होता. १९९२-९४ दरम्यान आक्रमक फलंदाजी करत महानामाने सहा कसोटीत तीन शतके झळकावली.
त्यांनी १९९९मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक कारकीर्दीतून खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारली व पंच म्हणून दुसरा डाव सुरू केला. २००४ मध्ये त्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून पदार्पण केले. आतापर्यंत त्यांनी अनेक कसोटी व वनडे सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.
Leave a Reply