नवीन लेखन...

आयपॅड

आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे. दृकश्राव्य माध्यमासारखा वापर करता यावा यासाठी त्याची निर्मिती अॅपल कंपनीने केली.

पुस्तके, नियतकालिके, चित्रपट, संगीत, गेम्स व इंटरनेटवरील माहिती या सर्व कारणांसाठी त्याचा उपयोग करता येतो. त्याचे वजन आहे १.५ पौंड म्हणजे ६८० ग्रॅम. संगणकाचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याचा आकार चार खोल्यांच्या फ्लॅटइतका होता व आता त्याचा आकार किती कमी झाला आहे बघा. एप्रिल २०१० मध्ये बाजारात आयपॅड बाजारात आला व अवघ्या ८० दिवसांत ३० लाख आयपॅड विकले गेले. टॅबलेट पीसी तयार करणाऱ्या इतरही कंपन्या असल्या तरी टॅबलेट कॉम्प्युटरच्या खपात ९५ टक्के वाटा अॅपलचा आहे. आयपॉड टच व आयफोन यांच्यासारख्याच ऑपरेटिंग सिस्टीमवर आयपॅड चालतो.

त्यात आयफोनची सुविधाही मिळते. आयफोन व आयपॉड टच प्रमाणे आयपॅडचे नियंत्रण हे मल्टीटच डिस्प्लेमुळे होते. इंटरनेट सर्फिंगसाठी त्यात वायफाय कनेक्शन वापरावे लागते. काही आयपॅडना थ्री जी वायरलेस चेजा कनेक्शन आहे. यूएसबी केबलच्या मदतीने पर्सनल कॉम्प्युटरवरही आयट्यूनच्या मदतीने ते चालवता येते.

अॅपल कंपनीने फॉक्सकॉनला हे आयपॅड्स तयार करण्याचे कंत्राट दिले आहे. यातील सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट १ गिगॅहर्टझचे आहे. फ्लॅश मेमरीवर चालणारे हे उपकरण आहे. त्याची माहिती साठवण क्षमता १६ जीबी, ३२ जीबी, ६४ जीबी किंवा त्याहून अधिक असू शकते.

आयपॅडमध्ये ९.७ इंच म्हणजे २५ से.मी.चा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) असतो. वाय फाय नेटवर्कने त्यावर इंटरनेट बघता येते. त्यात अंतर्गत स्पीकर असतात, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी मायक्रोफोन वापरता येतो. तैवानमध्ये बनवली जाणारी लिथियम आयन पॉलिमर बॅटरी त्यात वापतात. यात माहिती साठवण्यासाठी १६, ३२, ६४ जीबीचे फ्लॅश ड्राईव्ह असतात. आयबुक वाचण्याची सोय वात असते फक्त त्यासाठी तसे सॉफ्टवेअर घ्यावे लागते.

आयबुकस्टोअर हे फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. द वॉल स्ट्रीट जर्नल, बीबीसी व रॉयटर्स यांनी आयपॅडवर आपली सेवा दिली आहे. अॅपलच्या आयपॅडला अँड्रॉईडवर आधारित टॅबलेट पीसीने चांगलीच मात दिली आहे. या आयपॅड्सवर पुस्तके किंवा वर्तमानपत्रे वाचता येत असली तरी त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. मोटोरोलाचा झूम व अॅपलचा आयपॅड-२ यावर्षी बाजारात येत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..