नवीन लेखन...

भूकंपरोधक इमारत बांधणे शक्य आहे का?

भूकंपरोधक इमारत म्हणजे भूकंपाच्या धक्क्याते ज्या इमारतीचे कमीतकमी नुकसान होईल ती. भूकंप केव्हा, कधी, कुठे होईल याचे भाकीत करणे कठीण आहे. एखाद्या इमारतीला भूकंपाच्या धक्क्याला सामोरे जावेच लागेल, असे नाही. भूकंपामुळे इमारतीवर अतिरिक्त आडवा (लॅटरल) भार पडतो आणि ती हलते, किंवा धक्का सहन न होऊन पडते. त्यामुळे भूकंपाचा विचार न करता बांधलेली इमारत त्वरित कोसळू शकते.

असे जरी असले तरी अगदी भूकंपाचा सक्षमपणे प्रतिकार करणारी इमारत बांधणे कठीण आहे. आपण भूकंपरोधक इमारती बांधण्याचा प्रयत्न मात्र जरूर करू शकतो. अशा इमारतीत भूकंपाच्या धक्क्याने कमीतकमी नुकसान होईल. त्या साठी भारतीय मानक ब्युरोने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे पाळली गेली पाहिजेत.

यात अगदी सुरूवातीला इमारतीचे आरेखन आर्किटेक्ट करणार तेव्हापासूनच काही बंधने पाळावी लागतात. जसे इमारतीचा एकूण आकार उगीचच वेडावाकडा करण्यापेक्षा नीट चौकोनी असावा. इंग्रजी सी, वाय, एल अशा आकारापेक्षा चौकोनी आकार जास्त मजबूत होऊ शकतो. लांब लांब बाल्कन्यासुद्धा टाळाव्यात. तसेच स्थापत्य अभियंता आरेखन करतो त्यानेही आय एस कोड मधील मार्गदर्शक तत्वे नीट अभ्यासून आरेखन करावे. खांबाना इमारतीवरील वजनाप्रमाणेच आकार द्यावा आणि आवश्यक ती संख्या ठेवावीच. ठेकेदारानेसुद्धा बांधकामात चांगली गुणवत्ता राखली पाहिजे. खर्च तर वाचवावा पण तो मूळ आराखड्याला धक्का न लावता. सगळ्यात महत्वाचे केवळ सुंदर दिसते म्हणून इमारतीवर उगीचच अतिरिक्त अचल भार टाक नये. बांधकामादरम्यान योग्य देखरेखसुद्धा आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचे इमारत वापरणाऱ्यांनी तिची योग्य ती देखभाल आणि आवश्यक ती दुरूस्ती करणे पण गरजेचे आहे. सगळ्याच्या एकत्रित परिणामावरती इमारतीची भूकम्परोधन क्षमता ठरत असते. इतके सगळे करून अगदी भूकंपरोधक इमारत बांधली, पण त्या शेजारची इमारत मात्र योग्य रीतीने बांधलेली नसली आणि ती इमारत भूकंपादरम्यान चांगल्या इमारतीवर कोसळली तर ह्या चांगल्या इमारतीचे हकनाक नुकसान होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..