पक्षीय राजकारणाचा कुठलाही गंध नसलेले लोक हल्ली आपली मते फेसबुक वर मांडत आहेत.पक्षीय राजकारण हे संघटीत गुन्हेगारीचे एक स्वरूप बनले आहे.पक्षात काम करण्यासाठी तत्व ,सदाचार या गोष्टी आता गरजेच्या नाहीत.
प्रत्तेक गल्लीत ,विभागात ,गावात ,शहरात दादागिरी करणारे लोक वेगवेगळ्या पक्षाच्या वळचणीला जातात.तिथे आपली मक्तेदारी प्रस्थापित करतात.तिथे त्यांच्या पेक्षा वरचढ प्रतिस्पर्धी आला तर दुस-या पक्षात जातात.पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला आपला पक्ष वाढवण्यासाठी हे सर्व मान्य असते.त्यामुळे लोकशाहीत चांगले नेतृत्व लाभणे हे आता सर्वसामान्य लोकांच्या आणि प्रामाणिक करदात्यांच्या हातात नाही.
मी ज्या खारकर आळीत राहात होतो त्या भागात सुमारे ५० वर्षा पूर्वी सर्व मोठ्या पक्षांचे वरिष्ठ नेते राहात होते.त्यांची सदाचारी वृत्ती ,काम करण्याची चांगली पद्धत मी जवळून पाहिली आहे.ते दिवस गेले.आता पक्षाचा अजेंडा फक्त सत्ता हाच आहे.आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या तत्कालीन वादात आगरकरांचे मत काळाच्या कसोटीस दुर्दैवाने उतरले आहे.आपण स्वातंत्र आणि लोकशाहीच्या लायकीचे अजूनही झालो नाहीत .
सध्या जे चालले आहे ते बदलणे शक्य नाही.इंदिरा गांधी यांनी आणलेल्या आणीबाणी च्या काळात उत्पादन वाढले होते.दळणवळण व्यवस्था खूप सुधारली होती.शिस्त आणि प्रामाणिक पणाला सुरवात झाली होती.पण ती व्यवस्था पण टिकली नाही .पुन्हा लोकशाही आली .पुन्हा पहिले पाढे पंचावन्न .
देश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला हुकुमशहा मिळावा हीच आता देशाची गरज आहे.मग मोदी हुकुमशहा झाले तरी चालतील पण शासनाला अर्थात प्रशासनातील अधिका-यांना आता फक्त हुकुमशाहा च CONTROL करू शकतो.तो हुकुमशहा मात्र प्रामाणिक पाहीजे आपोआप सर्व सुता सारखे सरळ होतील .
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply