ईश्वराचा वास कोठे, प्रश्न नेहमी पडतो,
फुलांफुलांतील सुगंध,
मग त्याचे उत्तर देतो,–!!!
आकार फुलांचे विविध,
सुबक आणखी नाजूक,
एक नाही दुसऱ्यासारखे,
कोण त्यांना रेखितो,–!!!
पानांचे रंग निरखून पहा,
छटाही त्यांच्या निरनिराळ्या,
कोण त्यांना असे रंगवे,
रंगारी त्यांचा कुठला हा,–!!!
फुलती कळी जवळून पहा,
पाकळी पाकळी उमले,
कोण त्यांचा जन्मदाता,
आतून कोण त्यांना घडवे,–!!!
एक फळ नसते दुसऱ्यासारखे,
चव, रंग, आकार, नि दिसणे,
कोण त्यांची रूपरेषा आखे,
कोण बनवतो त्यांना बरे,–!!!
एक एक झाड असे निराळे,
लता वेली वृक्ष झुडुपे,
कोण त्यांची आखणी करतो,
कोण त्यांना मातीत पेरे,–!!!
अन्नपाणी, सूर्यप्रकाश,
कोण त्यांना पुरवतो, मातीतुनी प्रत्येक घटक,
ते सांगा,कसे शोषतो,
झाड इतुके सहनशील,
कोण त्यांना तसे बनवे,
घाव घातला कोणी जरी,
ते आपले बाहू फैलावे,
बी रुजते आपोआप,
कोंब त्यातूनच घडतो,
बी चे रूपांतर कसे,
कोण त्याचे रहस्य दडवतो,–?!!
कोंबाला फुटती धुमारे,
एकेक पान येऊ लागे, –
एका पानासमअसंख्य पाने,
कोण त्यांना जागा देतो,–!!!
किमया सारी निसर्गाची, विज्ञाननिष्ठ म्हणे, पण,
सृष्टी निसर्गाची आई,
तिलाही जन्मा घाले कोण,–???
. हिमगौरी कर्वे
©
Leave a Reply