एक श्वास सरून
दुसरा सुरु व्हावा
इतकं सहज सोपं सारं
जीव प्रवाही वाहत जावा
एकरूप एकतान
सृष्टीशी मिसळून यावा
नकोत मीपणाचे मुलामे
माज पुरता विरघळून जावा
एकला जीव आला गेला
सारा खेळ येथ खेळावा
हार जीत होते जाते
इथेच अहं सोडावा
चोच आहे चारा येईल
हा विश्वास धरावा
इवल्याशा खळगीसाठी
जीव कुणाचा न दुखवावा
सरतील ऋतू ग्रीष्माचेही
निसर्ग भिजून चिंब व्हावा
धावाधाव नको संचयासाठी
जरा घेऊ क्षणभर विसावा!!
— वर्षा कदम.
Leave a Reply