प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचा जन्म २४ जानेवारी १९२७ रोजी सियालकोट पंजाब येथे झाला.
१९७४ मध्ये ‘आप की कसम’ हा जे ओमप्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. आखिर क्यूँ आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे. अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्याआधी निर्माते अशी त्यांनी ओळख होती.
१९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला. आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन,, गेट वे ऑफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. जे ओमप्रकाश हे राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा.
हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. जे ओमप्रकाश यांचे ७ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=nNd7MznqvkU
https://www.youtube.com/watch?v=nNd7MznqvkU&t=23s
Leave a Reply