गाढ झोपेतून एकदा अचानक मला
जाग आली
माझ्या विश्वात डोकावून बघण्याची खूप
घाई झाली
आपल्याशिवाय सर्व काही सुरळीत पाहून
मन हेलावले
उद्विग्न मनास वाटले की आजवर
कोणासाठी जगले
कोणी रडावे कोणाचे अडावे असे
नाही वाटले
पण आपल्याशिवाय जग चालते हे
सत्य उमगले
प्रेम विरह सुख दु:खं सवेकाही
खोटं असतं
अखेरीस आपणच आपले सोबती हेच
खरं असते
जे आपले नसते त्यासाठी आपण
धडपडत असतो
त्या स्वप्नमय विश्वात अखेरपर्यंत
जगत असतो
वेळीच यावी जाग थांबविण्या रमणे
फसव्या विश्वात
निर्लेप होऊन जगावे प्रत्येक सेकंद
स्व’च्या शोधात
— @ मंजुषा देशपांडे,पुणे.