धागा धागा विणून, केली तयार जाळी
गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी….१,
स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे
सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे….२,
तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही
जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही….३,
जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ
संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply