अनेक महिन्यांनी नोकरी सोडल्यावर मी मित्राला भेटण्यासाठी म्हणून साईटवर गेलो.
सहज गप्पा मारता मारता मला ती दिसला , तिचा बाप ..
मी मित्राला म्हणालो हा इथे कसा आणि त्याची मुलगी ..
ती पण इथेच आहे …आठवते ना…
मी ते कधीच विसरू शकत नव्हतो …
…त्या दिवशी
काही तरी गडबड आहे हे निश्चित…
सकाळी साईटवर वेगळेच वातावरण जाणवत होते , हे मला साईटवर गेल्या गेल्या जाणवले…
सहज कालचे काम कसे झाले हे बघण्यासाठी चक्कर टाकू म्हटले आणि जाऊ लागलो
बाजूच्या दुतर्फा झोपड्यात सामसूम होती .
समोर त्या लहान ठेकेदाराची मुलगी येत होती…तिला धड चालताही येत नव्हते..वाटले पडली असेल….
त्या दिवशी जास्त कोणी कामावर आले नव्हते.
झोपड्यातल्या कॅंटीनमध्ये चहा-भजी मागवली…पोऱ्याला विचारले अरे सगळे आहेत कुठे …
तो म्हणाला साहेब नाही आले आपल्या मोठ्या ठेकेदाराने त्याच्या हाताखाली असलेल्या मुकादमाच्या पोरीबरोबर धमाल केली..
अरे पण त्या मुकादमाने काही केले नाही….
अहो त्यांनेच तर त्याची पोरगी दिली रात्रीसाठी…
पण इतर कामगारांनी पण त्यांचा उपास सोडला…
म्ह्णून मुकादम भडकला….
आता कळले ती पोरगी का लडबडत होती …तशी ती पोरगी चाप्टरच होती…अनेक वेळा तिला मी गावच्या पोरांबरोबर खाडीमधल्या झुडपात पहिली होती.
एकाने विचारले तेव्हा
त्याने तिच्याबरोबरच लग्नाचा कराराचा कागद दाखवला होता.
फुल म्यानेज…
मी पण हे विसरून गेली आमच्या कन्स्ट्रक्शन लाईनीत हे नेहमीचेच असते.
अन्याय वगैरे गोष्टी पैशापुढे पार फिक्या पडतात.
चार आठ दिवस झाले …तो मुकादम आणि ती पोरगी काय दिसली नाही.
पुढे मी पण ती नोकरी सोडली.
…आज तिच्या बापाला अनेक वर्षाने पाहिले…सहज मित्राला भेटण्यास त्याच कंपनीत गेलो होतो. इतक्यात तो ठेकेदार मुकादम दोघेही येताना दिसले .
तो काही कामासाठी माझ्या मित्राकडे येत असताना त्याचे लक्ष माझ्याकडे गेले…म्हणाला..
साहेब इथे…
म्हटले हो….
खूप वर्षे झाली…असतील…
….मी त्या पोरीबद्दल काहीच बोललो नाही…
तितक्यात त्याने त्या पोरीच्या नावाने बोंब ठोकली तशी ती आली…
आता ती बऱ्यापैकी ‘ मोठी ‘ झाली होती….म्हणण्यापेक्षा ‘ नजरेत मावत ‘ नव्हती ..
तिला काही काम सांगितले…तशी ती गेली…तो मुकादमही शिव्या घालत तिच्या मागोमाग गेला…
मी मित्राला म्हणालो अरे ही पोरगी इतकी मोठी झाली…
इथेच असते…तो म्हणाला इथेच असते…स्त्रियांची मुकादम म्हणून….
आणि आपला तो ठेकेदार कुठे…
मित्र म्हणाला हा इथला मोठा ठेकेदार आहे…..
मला बघून तो ठेकेदार धमाल हसला जुन्या आठवणी निघाल्या…
त्याला सहज म्हणालो ती आता दिसली….
डोळा मारत तो म्हणाला इथेच दिसणार …आणखी कुठे….
मी समजून गेलो …
की अजून काही आलबेल आणि मस्त चालले आहे…
साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो….
जग हे अनेक पायांवर चालते …
आपल्यासारखे दोन पायावर नाही….
सतीश चाफेकर
Leave a Reply