काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना
निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना
वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी
नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी
जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें
मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे
प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं
पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य नाहीं
उर्वरीत आयुष्याची रेखा, मर्यादेतच आखूनी काढी
समज येतां प्रभूचे सारे, समर्पण करीत जग सोडी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
डॉक्टर साहेब,
वय वाढलेल्या माझ्यासारख्यांना नक्कीच भावेल ही कविता. धन्यवाद.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक