गवाक्षातुनी डोकाविती
रविकिरण सुवर्णकांती
प्रहर प्रभाती चैतन्याचा
ब्रह्मांडी स्पंदने जागती
उजळते रूपरंग सृष्टिचे
धरा ल्याली हरितहिरवाई
झुळझुळतो गंधितवारा
तृणांकुरी , डुलती पाती
संथ वाहते गंगा पावन
पारावरी झुलतो पिंपळ
राऊळ गाभारी विश्वेश्वर
तेजाळती मंद फुलवाती
गुलमुसलेली सांज पश्चिमी
धुळ गोधुळीची आसमंती
अधीर ओढ़ ती पाऊलांना
ही वात्सल्यप्रीतीची नाती
संध्या बिलगते यामिनीला
शांत निःशब्द माहोल सारा
परिमार्जन , साऱ्या श्रमांचे
विसासते बाहुत भावप्रीती
— वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १६०
११ – ७ – २०२२
Leave a Reply