इंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे.
मी चहा पित नाही आसे म्हणनारी व्यक्ती मनातून कोणालाच आवडत नाही.”मला चहा आवडत नाही”!! असे म्हणनाऱ्या माणसासारखा या जगात “अरसिक” व शिष्ट दुसरा कोणी आसुच शकत नाही” असे चहा अॉफर करणाराचे प्रामाणिक मत असते. आमच्या घरी केंव्हाही कितीही वेळा चहा केला जातो व पिलाही जातो.चहा पिऊन कप खाली ठेवला रे ठेवला की आमच्या नाती नजर चूकवून पटकन कपातला तळाचा चहा प्यायला एकदम तरबेज झाल्यात.
चहा पिणारांच्या नाना तह्रा दिसतात.कोणाला गुळाचा चहा आवडतो,कोणाला साखरेचा ,कोणाला बिन साखरेचा तर कोणाला बिन दुधाचा पण साखर घातलेला,कोणाला बिन दुधाचा व बिनसाखरेचा.कोणाला विलायची घालून तर कोणाला आले किसून(इंग्रजी नव्हे ) घालून (नशिब आल्या बरोबर लसूण पेष्ट नाही टाकत )कोणाला गवती चहा तर कोणाला सुंठ घालून मसाला चहा. कोणाला मध घालून विनदुधाचा तर कोणाला खडी चम्मच चहा प्यायला आवडतो.
सगळ्यात लेमन टि नावाने जो कांही काढा पिणारे तर स्वतःला विलायतेतून तत्त्ववेत्ते आल्यासारखे इतर चहा शौकीनांना साधा देशी चहा कसा आरोग्याला हानीकारक आहे,त्याने पित्त कसे वाढते.पोट कसे वाढते.लेमन टी शरीरासाठी किती हेल्दी आहे.तो कसा अँटीअॉक्सीडंट आहे.शरिराचे मेटाबाॉलीझम कसे सुधारते वगैरे तत्वज्ञान सांगतात .इतपर्यंत ठिक आहे.पण स्वतःची बोजड शरीरष्टी सावरत “बाळासाहेब तुम्हीही सकाळ संध्याकाळ मी सांगतो तसा लेमन टी करून प्या व सहा महिण्याने बघा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या सारखे शिडसीडीत नाही झाला तर नाव बदलून देईन” (कोणाचे हे नाही सांगत )आसे सल्ला देतात तेव्हा मानात येते हे यांच्या खानदानासह इंग्रजांनी देश सोडला तेव्हाच त्यांच्या बरोबर का देश सोडून गेले नाहीत !.बरं हे आपल्याबरोबर लेमन टी प्यायला बसले तर एवढे हळू हळू स्टायलीश पणे एक एक घोट घेतात ना ! तेवढया वेळात आपण आपला चहाच काय पण चार व्हीस्कीचे पेग पण चकण्यासह संपवू शकतो.
कॉलेजात आसताना “आमृत तुल्य” चहाची हॉटेल गल्ली गल्लीतून होती.आता रस्तोरस्ती आमक्याचा चहा ,तमक्याचा चहा ,गुळाचा चहा,चुलीवरील गुळाचा चहा.शेंद्रीय गुळाचा चहा .अश्या जाहीरातीचे मोठमोठे फलक लावलेले दिसतात.आमचे शहरी मित्र सल्ला देतात “गुळाचा चहा पित जा शरीराला आरोग्यदायी असतो.आमतमक्या ठिकाणी चुलीवरचा चहा चांगला मिळतो ! तुझ्या रस्त्यावरच आहे .पित जा” .! “आरे बाबा आमच आत्तापर्यंतच आर्ध आयुष्य चुलीवरचा गुळाचा चहा,कधी दुधाचा तर जास्तवेळा दुध नसल्यामुळे बिन दुधाचा चहा पिण्यात गेलय “! असं सांगितले तर त्यांना विश्वास ठेवण्यास जड जाते.
चहाची एक वेगळीच न्यायालयीन संस्कृती तयार झालेली आहे. चहा हा आमच्या वकिलीचा जिव्हाळ्याचा विषय.न्यायालयात
शिल,मित्र,मैत्रीणि,सहकारी,पोलीस यांच्या सोबत नको नको म्हणत असताना किती कप चहा होतो ते त्या कॕन्टीनवाल्यालाच माहित!!.याला अपवाद फक्त डायबेटिस असलेले वकिल. सरकारी वकिल असतांना न्यायाधीश साहेबांच्या चेंबरमध्ये कॕन्टीनवाल्याने पाठवलेला खास स्पेशल कडक चहा पिल्यावर दिवसभर चहा प्यायची इच्छाच व्हायची नाही. कोर्टातील आमच्या एका मित्राची चहाची स्टाईल तर लई भारी. कपातील चहावर किंचितसाही सायीचा थर आलेला दिसला तरी तो चहा प्यायचा नाकारून कितीही वेळा परत परत चहा आणायला लागला तरी त्याची फिकीर न करता एकदम ताजा चहा कपात आल्याशिवाय पिणारच नाही.कोर्टातील कॕन्टीनचा चहा ज्यांनी पचवलेला आहे ते विष सुध्दा सहज पचवू शकतात. त्यांना शंकरासारखे कंठात ठेवायची पण गरज पडणार नाही ! चहा पाणाच्या कार्यक्रमात कितीतरी लग्ने जमलीत .लग्न जमवायच्या बैठकितही चहा व लग्न मोडायच्या बैठकीत ही चहाच.केवळ माणसा माणसातील प्रश्नच नव्हे तर नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रश्नही चहापाणाच्या कार्यक्रमात सुटलेले आहेत हा इतिहास आहे.विरोधी पक्ष राज्यातील प्रश्न सुटू नयेत म्हणून तर विधानसभा आधीवेशनाच्या पुर्वसंध्येला चहापानावर बहिस्कार तर घालीत नसतील ना ?लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे आज भारताचे पंतप्रधान आहेत.जर इंग्रजांनी चहाची सवयच भारतीयांना लावली नसती तर ना पंतप्रधानांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्टेशनवर चहा विकता आला आसता ! ना ते पंतप्रधान झाले असते! ना देशाची एवढी प्रगती झाली आसती.देशच नाही तर सर्व विश्वच एका महान विश्वगुरूला मुकले आसते.केवढे इंग्रजांचे भारतावरच नाहीतर जगावर उपकार आहेत!!
बायडीला नुकतीच हास्पीटलमधून ट्रीटमेंट घेऊन आणली होती. पावसाळी,वादळी वातावरण होत संध्याकाळी घरातील सिंगल माल्ट व्हीस्की घ्यावी म्हणून डायनींग टेबलवर ग्लास काजू बदाम डाळ फरसाण असा चकणा मांडून ठेवला होता. मुलीने चहा केलेला.मी फ्रेश होऊन डायनिंग टेबल जवळ आलो तर टेबलवरचा ग्लास व बाटली गायब झालेली.ग्लासच्या जागेवर वाफाळलेला चहाचा कप.बायडीकडे पाहिलेतर कांहीही झाले नाही असा चेहरा करून म्हणाली “एकदम कडक चहा झालाय.ह्या चकण्याबरोबर मस्त लागेल ! असे म्हणून आत निघून गेली.मला नाही वाटत चहाचा असा चकणा ठेऊन कोणी मान राखला असेल !! तो कप आणि त्यातील चहामधून निघणाऱ्या वाफेतील एक आस्पष्ट विलायती माणसाचा चेहरा माझ्याकडे बघून मोठमोठ्याने हासून दोघेही मला जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा देत होते.
बाळासाहेब खोपडे
मोरगांव /पुणे
२१ मे २०२४
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply