दर वर्षी मे महीन्याच्या पहील्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.
१९९८ मध्ये डॉ.मदन कटारिया जे The worldwide Laughter Yoga movement चे अध्यक्ष होते, त्यांनी या हास्य दिनाला सुरवात केली. भारतात डॉक्टर असलेले मदन कटारिया यांनी व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव जे त्यांच्या भावना व्यक्त करतात यापासून प्रेरित होऊन हास्य योग चळवळ सुरु केली. हास्य दिन हा एक सकारात्मक प्रकटीकरण आहे. ज्याने जगाला ते शांतता, बंधुता आणि मैत्रीचा संदेश मिळतो. आज जवळपास १०० देशात हास्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं. हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी आहे. हसणाऱ्या चेहऱ्या भोवती मित्रमैत्रिणींची गर्दी होते. एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो. शिवाय हसतमुख चेहऱ्याच्या व्यक्ती अनेक कठीण प्रसंगांवरही सहज मात करतात. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित केला तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होत असते.
हास्य ही मूलत: जागतिक भाषा आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्यायत तुम्ही गेला तरी या भाषेने तुम्ही इतरांसोबत संवाद साधू शकता. जगातील सर्व माणसे आनंदाची स्थिती व्यक्त करण्यासाठी याच भाषेचा वापर करतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी आनंद हाच त्यामागील भाव असतो. कुत्सित हास्य तेवढे प्रकर्षाने टाळावे. जगातील कोणत्याही दोन हसणार्या व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या असोत. कारण, हास्य हा सर्वांचा समान धर्म आहे. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी आनंदास्त्र आहे.
हसणे हे अनेक रोगांवर अत्यंत लाभदायक ठरू शकते. हसणे हे स्वभाव आणि उत्तम आरोग्यासाठी चांगले असते.
*खदखदून आणि मोकळेपणाने हसल्याने शरीरात एंडोर्फिस हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. त्यामुळे आहाराचे संतुलन ठेवण्यास मदत होते.
*चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. एका संशोधनानुसार मधुमेहाने पीडित लोकांनी जेवण केल्यानंतर कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवल्या जाऊ शकते.
*हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.
*शरीराची रोग प्रतिकारक क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली आनंदी राहिल्याने सक्षम होते. ज्यामुळे विविध संसर्ग आणि अॅ्लर्जीच्या प्रभावात येण्यापासून बचाव होतो. त्याचप्रमाणे अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती मिळते.
*एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी नेहमी मित्रांसोबत राहा. त्यांच्यासोबत चांगला आणि आनंदमय वेळ घालवा.
*एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.
*नेहमी हसत राहिल्याने शरीरातील उर्जेच्या स्तरात वाढ होते, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते आणि कामाच्या गुणवत्तेत वाढ होते.
*हसमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. हसणाऱ्या आणि नेहमी उत्साही राहणाऱ्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात.
*हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते.
*वजन वाढण्यासाठी बेशिस्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हस्त राहिल्याने तणाव वाढत नाही. त्याचप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा देखील होत नाही परिणामी वजन नियंत्रणात ठेवण्यास हसणे मदत करते.
जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply