नवीन लेखन...

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

अमेरिकेतील मार्क झुकेरबर्ग ( Mark Zuckerberg) या १९ वर्षांच्या तरुणाने आपल्या तीन मित्रांच्या सहाय्याने एक खाजगी वेबसाईट ‘गम्मत’ म्हणून सुरु केली. ‘ सोशल Networking ‘ असे त्या वेबसाईटचे स्वरूप होते. पण अल्पावधीत हि वेबसाईट जगात प्रचंड लोकप्रिय होईल आणि तरुण वयातच आपल्याला जागतिक गौरव आणि मान सन्मान मिळेल असे मार्कला स्वप्नात सुध्धा वाटले नव्हते. या वेबसाईट चे नाव आहे फेसबुक.

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

जुलै २००९ मध्ये फेसबुक च्या सभासदांची संख्या ५० कोटी होती. ती आता ६० कोटी झाली असावी असा अंदाज आहे. फेसबुक च्या सभासदांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले तर लोकसंख्येच्या मानाने तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश ठरेल. जगातील सर्वात मोठे देश व त्यांची लोकसंख्या खालीलप्रमाणे:

चीन – १३३ कोटी
भारत – ११७ कोटी
फेसबुक – ६० कोटी
अमेरिका – ३१ कोटी
इंडोनेशिया – २४ कोटी

फेसबुक च्या प्रगतीचा आलेख

फेब्रुवारी २००४ – फेसबुक ची सुरवात
डिसेम्बर २००४ – १० लाख सभासद
डिसेम्बर २००५ – ५५ लाख सभासद
डिसेम्बर २००६ – १.२ कोटी सभासद
एप्रिल २००७ – २ कोटी सभासद
ऑगस्ट २००८ – १० कोटी सभासद
एप्रिल २००९ – २० कोटी सभासद
सप्टेंबर २००९ – ३० कोटी सभासद
फेब्रुवारी २०१० -४० कोटी सभासद
जुलाई २०१० – ५० कोटी सभासद

मार्क झुकेरबर्ग ( Mark Zuckerberg) आणि फेसबुक

Time या जगातील प्रतिष्ठित मासिकाने मार्कचा २०१० सालचा फेस ऑफ दि इयर ( Face of the year ) म्हणून गौरव करून त्याचा सन्मान केला आहे. आज मार्क केवळ २६ वर्षांचा आहे. इतक्या तरुण वयात असा सन्मान मिळविणारा तो जगातील दुसरी व्यक्ती आहे. या आधी ८३ वर्षांपूर्वी म्हणजे १९२७ साली हा सन्मान चार्लस लिंडबर्ग (Charles Lindberg ) याला वयाच्या २५ व्या वर्षी मिळाला होता. आज मार्क प्रसिध्धीच्या झोतात आला आहे तो एका वेगळ्या कारणाने. त्याने १०० कोटी डॉलर्स एवढी संपत्ती समाज कार्यासाठी दान करून तरुणांपुढे एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अजून बरीच मोठी संपत्ती समाज कार्यासाठी दान करण्याची घोषणा त्याने केली आहे. इतक्या लहान वयात तुम्ही एवढी संपत्ती दान का करते असे मार्कला एकाने विचारले. तेंव्हा त्याने उत्तर दिले कि एखादी संपत्ती समाज कार्यासाठी दान देण्यासाठी म्हातारे किंवा वृद्ध होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ज्या वेळी आपण दान करू शकतो त्याचवेळी दान देणे योग्य असते.

मार्क एका मध्यम वर्गीय कुटुंबातून आला असून त्याची राहणी पण तशीच आहे. अजूनही तो ऑफिस जवळ असलेल्या भाड्याच्या घरात राहतो. कंपनीत तो चालत जातो. त्याच्याकडे सुबारू ही स्वस्तातील मोटार आहे. तो सूट, बूट, टाय असे फ्याशनेबल कपडे कधीच वापरत नाही. त्याचे कपडे अगदी साधे म्हणजे जीन प्यांट, टी शर्ट, शूज असे काज्युअल असतात. त्याच्या कंपनीत त्याला केबिन, चेम्बर, सेक्रेटरी असा थाट नाही. त्याचे ऑफिस म्हणजे एक भला मोठा हॉल असून सगळे जण त्या हॉल मध्ये बसूनच काम करतात. मार्क पण तिथे बसूनच काम करतो. त्याने आपल्या कंपनीत एक आगळी वेगळी कॉन्फेरेस रूम ( Conferrence Room ) बांधली आहे. या कॉन्फेरंस रूमच्या सर्व भिंती काचेच्या आहेत. मार्कचे म्हणणे आहे कि कॉन्फेरंस रूम मध्ये काय चालते हे सगळ्यांना दिसायला हवे. कारण त्याचा पारदर्शी पणावर ( Transperency वर ) पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत फेसबुक ला अनेक प्रसिध्ध व्यक्तींनी भेट दिली आहे. या मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती George W Bush , अमेरिकेचे माजी उपराष्टापती अल गोर, CBI आणि FBI या संथांचे प्रमुख, अनेक देशांचे प्रतिनिधी, हॉलीवूड मधील बडी स्टार मंडळी यांचा समावेश आहे. या सगळ्यांबरोब झालेल्या चर्चा याच काचेच्या भिंती असलेल्या कॉन्फेरंस रूम मध्ये झाल्या आहेत.

हल्लीचे तरुण हे ऐदी, आळशी, निकम्मे, चैनीची चटक लागलेले, बेजबाबदार असतात असा अनेकांचा झालेला समज मार्क आणि त्याच्या टीमने खोटा ठरवला आहे. कारण आज फेसबुक मध्ये जे २००० लोक काम करतात त्यातील ९८ % लीकांचे वय ३० वर्षांच्या आतले आहे. आजचे तरुण काय चमत्कार करू शकतात हे मार्कने दाखवून दिले आहे.

एखादा भारतीय आणि त्यातूनही एखादा मराठी तरुण अशा प्रकारची कंपनी किंवा व्यवसाय उभारू शकेल काय ?

— उल्हास हरी जोशी
January 31, 2011

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..