विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी,
जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी … ।। ध्रु ।।
सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी,
झोपेमध्ये जगा विसरता, सर्ववेळी तू जाग्रण करी…।।१।।
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी,
धावपळीत चाले जीवन, संकट भोवऱ्यात फिरून
दुर्घटनेची चाहूल देवून, मनास आमच्या दक्ष करी…२
जगदंबे अवती -भवती राहून माझे रक्षण करी,
पसरता दु:खाचा सागर, सुख रत्ने कशी शोधणार,
किरण दाखवून आशेचे, दु:ख तू आमचे दूर करी…३,
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी
अगणित प्रश्न संसाराचे, कसे करू उकलन त्यांचे,
सोडविण्यासाठी सारे प्रश्न, मदत आम्हांला तूच करी..४,
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagaprkar@gmail.com
Leave a Reply